नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाआधी बार्शीत लिटमस चाचणी झाली. बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊतांनी विरोधकांना सुपडा साफ केला आहे. त्यांच्या गटाने 18 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे.
दोन्ही आमदाराच्या घरातील उमेदवार नव्हता तरीही चुरशीची लढत
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीमुळे बार्शीत राजकीय वातावरण तापले होते. बार्शी तालुक्यातील पारंपारिक प्रतिस्पर्धी विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत हे बाजार समितीच्या निवडणुकीत आमने सामने आले होते. सोपल आणि राऊत या दोन्ही गटांकडून मोठ्या अटीतटीने निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजार समितीच्या निवडणुकीत प्रथमच आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या घरातील कोणीही उमेदवार नव्हता.तरीही ही निवडणूक चुरशीची झाली होती.
Baba Adhav Passes Away : कष्टकरी आणि श्रमिकांचा चेहरा हरपला, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन
नगरपरिषद निवडणुकी अगोदर लिटमस चाचणी
बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्त्यांसाठी जोर लावला होता. मतदानापूर्वीच माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास पॅनेलचे व्यापारी मतदारसंघातील दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेले होते. रविवारी (ता. 07 डिसेंबर) 16 जागांसाठी चुरशीने 96.98 टक्के मतदान झाले होते. सोमवारी 9 डिसेंबर रोजी दिवसभर मतमोजणी संपन्न झाली. नगरपरीषदेचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. त्या अगोदरच बाजार समितीच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत राऊत गटाने सोपल गटाचा धुव्वा उडविला आहे. नगरपरीषदेच्या निकाला अगोदर बार्शीत लिटमस चाचणी झाली आणि त्या चाचणीत राऊत गटाचा विजय झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
‘Ravindra Chavan माझ्या मोठ्या भावाप्रमाणे’, आमदार निलेश राणे यांचं वक्तव्य, दोघांची दिलजमाई
राऊत गटाच्या बळिराजा विकास आघाडीचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते :
सहकारी संस्था : सुरेश गुंड (815), बाबा गायकवाड (790), विजय गरड (804), अभिजित कापसे (798), प्रभाकर डंबरे (818), रविकांत साळुंखे (791), यशवंत माने (813).महिला राखीव : मनीषा ताकभाते (850), सुमन पाटील (844). इतर मागासवर्गीय प्रवर्ग : संजयकुमार माळी (852).
विमुक्त जाती भटक्या जमाती : रामेश्वर पाटील (829)
ग्रामपंचायत मतदार संघ : नेताजी घायतिडक (632), अजित बारंगुळे (626) अनुसूचित जाती जमाती : सतीश हनुमंते (620). आर्थिक दुर्बल घटक : सचिन बुरगुटे (621). हमाल तोलार मतदारसंघ : गजेंद्र मुकटे (727)
