Nashik Saptashrungi Car Accident : पटेल स्वतः कार चालवत दिंडोरीमार्गे सप्तशृंगी गडावर निघाले असताना वाटेत हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
पटेल कुटुंब त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी जाताना इनोव्हा कारच्या (एमएच १५/बीएन ०५५५) चालकाचा गडाजवळील भवरीनाला धबधबा घाट परिसरातील रस्त्यातील एका वळणावर पुढे जाण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील ताबा सुटला. घाटाच्या कुमकुवत संरक्षक कठड्याला वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतर वाहन थेट ७०० फूट दरीत कोसळले.
Bengaluru Crime : सूनबाई, आज तूच शाळेतून आण त्याला; सासऱ्यांनी लगबगीने फोन ठेवला, घरी पोहोचताच चक्रावणारं दृश्य, दोघंही…
सप्तशृंगी देवी ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचे पथक, ग्रामपंचायत यंत्रणा, रोप वे ट्रॉलीचे कर्मचारी पथक, नांदुरी ग्रामपंचायत, वन विभाग प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. दोरखंड बांधून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दरीत उतरले. मोबाइलच्या टॉर्चमध्ये मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले. या वेळी सहा-सात रुग्णवाहिका घाटात दाखल झाल्या होत्या. या वेळी सप्तशृंग गडाचे उपसरपंच संदीप बेनके व सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
Student Death : तुमचा मुलगा… शाळेतून फोन, सशाच्या काळजाने बाप पोहोचला, तोवर सगळं संपलेलं; 11 वर्षांच्या लेकराचा मृत्यू, कारण हादरवणारं
चालक बदलला अन् घात झाला
कीर्ती पटेल यांच्या कुटुंबीयांचे पिंपळगाव बसवंत येथे सॉ मिल, मार्बलचा व्यवसाय आहे. पिंपळगाव शहरातील मनमिळावू व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते. पटेल यांच्यासह नातेवाईक व त्यांची पत्नी असे सहा जण इनोव्हा कारमध्ये होते. सकाळी ते त्र्यंबकेश्वरला गेले. तेथून ते नाशिकला आले. नाशिकला द्वारका येथे चालक काही कामासाठी उतरला. त्यामुळे पटेल स्वतः कार चालवत दिंडोरीमार्गे सप्तशृंगी गडावर निघाले, तेव्हा वाटेत हा अपघात झाला.
