Jamkhed Deepali Patil Case : एका नृत्यांगनेने साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून माजी नगरसेवक संदीप गायकवाड याच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
आरोपीची पत्नीच निवडणुकीत उमेदवार
या प्रकरणाला अधिक नाट्यमय रंग चढताना दिसत आहे. कारण आरोपी संदीप गायकवाड याची पत्नी भाजपकडून जामखेड नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक पदाच्या रिंगणात उभ्या आहेत. 21 डिसेंबरला निकाल लागू घातलेला असताना, पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक देखील करण्यात आली आहे आणि पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहे, त्यामुळे जामखेडच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Accident News : कारचा स्पीड 140 किमी प्रतितास, ट्रकच्या मागच्या बाजूस घुसली, वाहनाचा अक्षरश: चेंदामेंदा; दोन्ही मित्रांचा जागीच अंत
पहिलं लग्न असूनही दुसऱ्या लग्नाचा तगादा का?
संदीप गायकवाड याचं पहिलं लग्न झालेलं असूनही, दुसऱ्या विवाहासाठीच त्याने दिपालीवर दबाव टाकल्याचा आरोप फिर्यादीचा आहे. यावरून स्थानिकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. पत्नी स्वतः निवडणूक लढवतेय, मग पती दुसऱ्या लग्नासाठी का तगादा लावतोय? राजकीय महत्त्वाकांक्षा की वैयक्तिक स्वार्थ? यामागे नक्की कोणता खेळ? एका बाजूला घरात राजकीय प्रचार, दुसऱ्या बाजूला नात्यातील ताण, अखेर दिपालीला काय सहन करावं लागलं? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.
Pune Crime : ‘माझी प्रिय दिदी…’; व्हॉट्सअॅपवर भावनिक स्टेटस, पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे बेपत्ता, वरिष्ठांवर गंभीर आरोप; पुण्यात खळबळ
जामखेडमध्ये चर्चांना उधाण
जामखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून संदीप गायकवाड याला अटक केली आहे. घटनेनंतर शहरात राजकीय वातावरण तंग झालं असून पत्नी निवडणुकीत, पतीवर गंभीर आरोप आणि अटकही समीकरण स्थानिक पातळीवर मोठे राजकीय वादळ उभे करत आहे.
