Nanded Saksham Tate Murder Case : नांदेडमधील सक्षम ताटे प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. हत्येआधी आरोपींनी सक्षमच्या घराची रेकी केली होती, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.
सक्षम ताटे खून प्रकरणात सातवा आरोपी अटक
27 नोव्हेंबर रोजी सक्षम गौतम ताटे या तरुणाची हत्या झाली होती. या प्रकरणी एक महिला आणि एक अल्पवयीन बालक अशा सहा लोकांना अटक केली होती. त्यातील चार जण 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी दि. 2 नोव्हेंबर रोजी रात्री सातव्या आरोपीला अटक केली होती. त्याला कोर्टाने तीन दिवसांची पोली कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सातवा संशयित आरोपी अमन देविदास शिरसे (वय 22 रा. माळटेकडी, नांदेड) यास अटक केली होती. संशयित आरोपी अमन शिरसेला न्यायालयासमक्ष हजर केले. या प्रकरणात आरोपी अमन शिरसे याला तीन दिवस अर्थात आजपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
Amba Ghat Bus Accident : नेपाळहून कोकणात कामाला निघाले, सर्वजण साखरझोपेत, भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
नेमकं प्रकरण काय?
सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधांना आंचलच्या कुटुंबीयांचा विरोध होता. आंचल हिचे कुटुंबीय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात सक्षम ताटे याला गोळ्या घालून आणि डोक्यात फरशी घालून त्याची निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणात आता दररोज नवनवीन पैलू समोर येताना दिसत आहेत. सक्षम ताटे याच्या आईने आंचलचे वडील गजानन मामीडवार आणि भावांवर गंभीर आरोप केले आहेत. आंचलच्या भावांनी मध्यंतरी सक्षमला फक्त काटे असलेलं गुलाबाचे झाड भेट म्हणून दिलं होतं. तेव्हाच त्यांनी आधीच प्लान केला होता, असं सक्षमच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.
Nandurbar News : सारंगखेडा अश्वबाजारात पुण्यातील भाजप आमदाराच्या लेकाची खरेदी, 1111111 रुपयांना घेतलेल्या नुकरा घोडीची वैशिष्ट्यं काय?
सक्षमच्या आईने काय आरोप केला?
सुरुवातीला सक्षमचं लग्न आंचलशी करुन देतो म्हणत आंचलचा बाप सक्षमला खांद्यावर घेऊन जयंतीत नाचला. मात्र, नंतर पाळत ठेवून त्यांनी सक्षमचा कायमस्वरूपी काटाच काढला. त्याअगोदर आंचलच्या भावाने सक्षमच्या वाढदिवसाला त्याला काटेरी गुलाबाचं काट्याचं झाड देऊन त्याचा काटा काढला, असा आरोप मयत सक्षमच्या आईने केला आहे.
