अहिल्यानगर पोलिसांनी इंस्टाग्रामवर रिलस्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोमल काळे आणि तिचा प्रियकर सुजित चौधरला अटक केली. बस प्रवासात महिलांच्या पर्स व दागिन्यांची चोरी करणाऱ्या या टोळीकडून…
मोठ्या शिताफीने पर्स…
19 नोव्हेंबर रोजी पाथर्डी–कल्याण एस.टी.ने प्रवासात असलेल्या सौ. अलका पालवे यांच्या पर्सवर कोमलने हात साफ केल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिस तपासात दोघांनी चोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम विकून ₹1.70 लाखांचा आयफोन 17 प्रो मॅक्स व ₹15 हजारांचा ओप्पो मोबाईल खरेदी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी चोरी केलेले 6. 5 तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ₹9,35,230 किंमतीचा माल जप्त केला.
बसस्थानकातून कोमल अटक, प्रियकर शेवगावातून पकडला
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने नवीन बसस्थानक परिसरातून कोमलला जेरबंद केले. कोमलने चौकशीत गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल प्रियकर सुजितकडे असल्याचा खुलासा केला. त्यानंतर पथकाने वेगाने कारवाई करत सुजितलाही शेवगाव येथे अटक केली.
बंटी–बबली जोडीचे आणखी गुन्हे उघड
चौकशीत दोघांनी आणखी दोन बस मधील चोरीची कबुली दिली़. 18/10/2025 – अमरापुर–शेवगाव बस 2)20/11/2025 – पाथर्डी–भगुर बस दोन्ही गुन्ह्यांची नोंद शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आधीच झालेली आहे.
कोमल इंस्टावर फेमस रिलस्टार पण प्रत्यक्षात सराईत गुन्हेगार
इंस्टाग्राम आयडी komal_kale_1_ वर 50 हजारांहून अधिक फॉलोवर्स, रिल्स शूट करणारी इंस्टा मॉडेल अशी स्वतःची ओळख सांगून कोमल बसप्रवासात महिलांचा विश्वास संपादन करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्यावर पूर्वी बीड व अहिल्यानगरमध्ये 3 गुन्हे, तर सुजितवर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे 8 गुन्हे नोंद असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे.
‘सेलिब्रिटी व भोळ्या चेहऱ्यांपासून सावध रहा’
पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की, बसने प्रवास करताना अनोळखी व्यक्तींचा सहवास, गप्पा करणे, पर्स त्यांच्या जवळ ठेवणे टाळावे. इंस्टाग्राम स्टार किंवा स्मार्ट दिसणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास न ठेवता सावध राहावे.
