Raigad Bus Accident: रायगडमध्ये पहाटेच्या सुमारास सहलीला निघालेल्या विकास कोचिंग क्लासच्या बसला भीषण अपघात झाला. नांदगाव परिसरात बस चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात चार विद्यार्थिनींसह
कसा घडला अपघात?
प्राथमिक माहितीनुसार, बसचालक योगेश वसंत जाधव हे रस्त्याने सरळ न जाता पुलाखालून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बस घेऊन गेले होते. अंधार, अरुंद रस्ता आणि पहाटेच्या दाट धुक्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली असेल असा अंदाज आहे. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले असून त्यामध्ये चार विद्यार्थिनी, एक शिक्षक आणि खुद्द चालकाचा समावेश आहे. आदिती रवींद्र खैरमोडे(वय 16, रा. गोटखिंड, ता. वाळवा, जि. सांगली, अक्षरा अजय जाधव( वय 16, रा. भाऊची, ता. वाळवा), आदिती दीपक खाडे(वय 16, रा. भाऊची),सिद्धी दीपक ठोकळे( वय 16, रा. बावची, ता. वाळवा),जगन्नाथ विश्वास येवले( शिक्षक, वय 45, रा. गोटखिंडी, ता. वाळवा) आणि योगेश वसंत जाधव (चालक, वय 35, रा. कवठे पिराद, ता. मिरज) हे या अपघातात जखमी झाले आहेत.
Nashik Accident: करोनात पतीचं निधन, पदरात 5 लेकरं, पण आईने हिंमत नाही हारली, एक चूक अन् सारं काही संपलं
जीवितहानी नाही
अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आणि पोलीस पथकाने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना त्वरित महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; परंतु काही विद्यार्थिनींना धक्का बसल्याने वातावरणात भीतीचे सावट आहे.
शिवसेना उबाठा-मनसे युती फिक्स, अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत मोठं विधान, वसंत मोरे म्हणाले?
घटनेनंतर रायगड पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून, कायदेशीर तपास सुरू आहे. अपघात नेमका कसा झाला याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बस रस्त्यापासून दूर पलटी झाल्याने वाहतूक सुरळीत चालू आहे. विद्यार्थिनींची सहल आनंदाने सुरू होण्याआधीच काळवंडल्याने सांगली आणि रायगड या दोन्ही ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे. पालकांना सतत मुलांच्या सुरक्षिततेची भीती असल्याने सहलींच्या आयोजनातील सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणीही होत आहे.
