• Tue. Mar 10th, 2026

    नवी मुंबई विमानतळ ‘टेक ऑफ’साठी रेडी! एका महिन्यात उड्डाणांना सुरूवात; विमान सेवांची सविस्तर माहिती पाहा

    नवी मुंबई विमानतळ ‘टेक ऑफ’साठी रेडी! एका महिन्यात उड्डाणांना सुरूवात; विमान सेवांची सविस्तर माहिती पाहा

    NMIA Flight Details: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होत आहे. 24 डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यात विमानतळ मर्यादित वेळेसाठी सुरू होईल. सुरुवातीला दिवसाला 23 उड्डाणे होतील. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्या महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहेत.

    नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रत्यक्ष उड्डाणांसाठी हिरवा कंदील मिळण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 24 डिसेंबरला सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात विमानतळ फक्त 12 तास, सकाळी 8 ते रात्री 8, कार्यरत राहणार आहे. या मर्यादित वेळेत दिवसाला 23 उड्डाणे सुरू होणार असून 2026 च्या सुरुवातीपर्यंत हा आकडा 34 पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

    इंडोगीसोबत शुभारंभ

    मोठ्या विमान कंपन्यांनी NMIA ला महत्त्वाच्या मार्गांशी जोडण्याची तयारी केली आहे. इंडिगोची योजना सर्वाधिक चर्चेत आहे. कंपनी दर आठवड्याला 67 उड्डाणे देणार असली, तरी मे 2025 मध्ये जाहीर केलेल्या “दिवसाला 18 उड्डाणे आणि 15 शहरे” या मोठ्या घोषणेपासून ती सध्या दूर आहे. तरीही या कंपनीने दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादसह 10 प्रमुख शहरांना सुरुवातीपासूनच जोडण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच 29 ते 30 डिसेंबर दरम्यान तीन नवीन मार्ग (चेन्नई, कोयंबतूर, वडोदरा) सुरू होत आहेत.Maharashtra Timesतीन नवे उड्डाणपुल, विमानतळाला थेट जोडणी; ठाणे-बेलापूर मार्गाचा होणार कायापालट, पाहा कुठून कुठे जोडणार

    अकासा आणि एअर इंडियाचे प्लॅन

    अकासा एअरने सुरुवातीला दिल्ली आणि गोवा-मोप्सा या फायद्याच्या मार्गांची निवड केली आहे. डिसेंबरअखेर कोची आणि एकमेव आठवड्याचे उड्डाण, अहमदाबाद, जोडले जाईल. त्यांच्या नेटवर्क प्लॅनिंगमध्ये स्पष्टपणे ‘हळूहळू वाढ’ ही रणनीती दिसते. एअर इंडिया एक्सप्रेस सर्वात उशिरा घोषणेसह मैदानात उतरली असली तरी बेंगळुरू आणि दिल्ली या उच्च मागणी असलेल्या मार्गांवर दररोज व आठवड्यातून 5 उड्डाणे देत प्रवेश करणार आहे. जानेवारीत त्यांच्या शेड्युलमध्ये वेगाने वाढ करून कंपनी दिल्लीसाठी आठवड्यात 12 उड्डाणांवर आणि बेंगळुरूसाठी दररोज दोन उड्डाणांवर जाण्याची तयारी करत आहे.

    आपल्या पिढीसाठी एकच विचार भाजपचं १०० टक्के सरकार; डोबिंवलीत रविंद्र चव्हाणांची फिल्डिंग!

    या सर्व घडामोडींमुळे NMIA हा मुंबईतील वाढत्या प्रवासी दाबाला कमी करणारा मोठा पर्याय ठरणार आहे. जास्तीत जास्त शहरे या नव्या विमानतळाशी जोडणे, स्लॉट्सची स्मार्ट विभागणी आणि टप्प्याटप्प्याने वाढ, यामुळे NMIA पुढील वर्षभरातच एक प्रमुख हब बनेल, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा