• Sun. Jun 7th, 2026
    मुलींचे आजारपण दूर करायला कोथरुडच्या दाम्पत्याचे 14 कोटी लाटले, आरोपींचे 1139 संशयित बँक व्यवहार, वेदिकाने तर…

    Pune Vedika Pandharpurkar Fraud Case : आरोपींनी कोथरुडच्या दाम्पत्याची फसवणूक करून १४ कोटी ३९ लाख २० हजार उकळले असून, ही रक्कम त्यांनी विविध ठिकाणी फिरविल्याचे निदर्शनास आले आहे.

    वेदिका पंढरपूरकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : दुर्धर विकाराने ग्रस्त मुलीचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील दाम्पत्याची चौदा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींकडून एकूण ५४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या वेगवेगळ्या ३९ बँक खात्यांपैकी तेरा बँक खात्यांची माहिती उघड झाली असून, त्यामध्ये तब्बल एक हजार १३९ संशयित बँक व्यवहार निदर्शनास आले आहेत. आरोपींनी या दाम्पत्यासह इतरांची फसवणूक करून लाटलेले सोने काही खासगी सावकारांकडे गहाण ठेवून सुमारे ६० लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    या गुन्ह्यात वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय ४१), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय ४२, दोघे रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) आणि दीपक जनार्दन खडके (वय ६५, रा. वाडीवरे, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. वेदिकाची आई व भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesAman Kumar : बाबा, मला तुमच्या मांडीवर घ्या, दुखणं असह्य झालंय… 15 वर्षांच्या लेकराने तडफडून प्राण सोडले, पिता हतबल
    आरोपींनी दाम्पत्याची फसवणूक करून १४ कोटी ३९ लाख २० हजार उकळले असून, ही रक्कम त्यांनी विविध ठिकाणी फिरविल्याचे निदर्शनास आले आहे. या रकमेतून आरोपींनी काही मालमत्ता व वाहने विकत घेतली आहेत. या मालमत्तेचे सहा ते सात नोंदणी दस्त विशेष नोंदणी व महानिरीक्षक यांच्याकडून पोलिसांना मिळाले आहेत.

    आरोपींच्या तेरा बँक खात्यांची माहिती उघड झाल्याने तिघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडून वाहने आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ५४ लाख रुपये जप्त व संरक्षित करण्यात आलेले आहेत. आरोपींनी पैशांचा वापर कशासाठी केला याची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली.
    Maharashtra TimesCrime News : नाही रे… मला नाही करायचंय आज… लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूचा शरीरसंबंधांना नकार, नवरदेवाने तिला जीव जाईपर्यंत…
    आरोपींनी त्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता आहे. आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी केला. मूळ तक्रारदारांच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपींना तीन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा