• Sat. Mar 7th, 2026

    बापाने सहा वर्षांच्या लेकीला दारू पाजली आणि… नराधमाच्या धक्कादायक कृत्याने नाशिकमध्ये खळबळ

    बापाने सहा वर्षांच्या लेकीला दारू पाजली आणि… नराधमाच्या धक्कादायक कृत्याने नाशिकमध्ये खळबळ

    Nashik Crime: नाशिकच्या भगूर येथे एका सावत्र बापाने आपल्या 6 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने दारू पाजून मुलीला अयोग्य स्पर्श केला.

    नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बाप-लेकीच्या नात्यावर काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. एका सावत्र बापाने त्याच्या 6 वर्षांच्या चिमुरडीचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने तिचा छळ केल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

    नाशिकच्या भगूर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी (26 नोव्हेंबर) ला नाशिकच्या भगूर मध्ये सुकापूर पेठेत ही घटना घडली आहे. राहुल रावत (मूळ रा.गाव – सरिया तोल,जिल्हा सतना,राज्य मध्य प्रदेश) हा त्याची पत्नी आणि तिच्या 6 वर्षांच्या मुलीसोबत येथे राहत होता. संशियित राहुल हा मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतो. बुधवारी घरात मुलीच्या अज्ञात पणाचा फायदा घेऊन त्याने तिला दारू पाजली. त्यानंतर तिच्या शरिराला अयोग्य पद्धतिने स्पर्ष करून तिचा लैंगिक छळ केला.

    Maharashtra TimesMumbai Crime : कुर्ल्यामध्ये पहाटे बस स्थानकावर थांबलेल्या विद्यार्थ्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे न्यायालयाकडून तीन वर्षांची शिक्षा

    मुलीच्या आईने हा प्रकार बघताच तिने लगेच पतीला जाब विचारला आणि मुलीला घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे जाऊन तिने संशयित राहुल विरोधात तक्रार नोंदवली. नोंदवलेल्या तक्रारी नुसार राहुल बब्बु रावत याच्यावर देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित राहुल रावत याला बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अंधेरीमध्ये मॉडेलने केले ब्लॅकमेल

    दरम्यान अंधेरीमध्ये ही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधेरी पोलिसांनी एका ३१ वर्षीय संघर्षशील मॉडेलला ड्रग्ज देणे, ब्लॅकमेल करणे आणि तिच्या २२ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी शोधून काढले आहे की आरोपी तरुणींना मार्केटिंग नोकरीचे आमिष दाखवून बनावट व्यवसाय चालवत होता.

    कोंबडीवरून नारायण राणेंचं नाव घेताच हशा पिकला; भर सभेत गुलाबराव पाटील यांची टोलेबाजी

    अंधेरी येथे राहणाऱ्या आरोपीने जेबी नगर येथील एका लॉजमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती आणि ती तिचे ‘कार्यालय’ असल्याचा दावा करत होती. ती अनेक दिवसांपासून लॉजमधून काम करत होती आणि ‘गरम मसाला’ उत्पादनांचे मार्केटिंग आणि विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे भासवत होती. पीडिता, एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी, अर्धवेळ काम शोधत होती, तिने ऑनलाइन जाहिरातीद्वारे नोकरीसाठी अर्ज केला आणि निवड झाल्यानंतर लगेचच ती रुजू झाली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा