• Sat. Jun 6th, 2026

    कोणाच्या बेडरुममध्ये जायला आवडत नाही! आमदार राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड; गंभीर आरोप

    कोणाच्या बेडरुममध्ये जायला आवडत नाही! आमदार राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड; गंभीर आरोप

    मालवणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापले असताना, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत राणे यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत पुरावे सादर केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सिंधुदुर्ग: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवसेनेचे आमदार निलेश राणे ंनी मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. मतदानाच्या तोंडावर भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला. निलेश राणे इन्स्टाग्रामवरुन लाईव्ह करत भाजपवर आरोप केले. यावेळी त्यांनी घरात टेबलवर ठेवलेली एक बॅग दाखवली. घरात पैशांनी भरलेल्या आणखी ३ ते ४ बॅगा असल्याचा आरोप त्यांनी केला.

    मालवण नगर परिषदेसाठी २ डिसेंबरला मतदान होत आहे. ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात सत्तेत सोबत असलेले दोन प्रमुख पक्ष मालवणमध्ये एकमेकांविरोधात लढत आहेत. शिंदेसेना विरुद्ध भाजपमध्ये थेट संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष आता गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप राणेंनी केला.
    Maharashtra Timesसर्वात मोठी बातमी! उज्ज्वला थिटे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, अनगर नगरपंचायतीचा तिढा सुटला
    चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पैशांचं वाटप सुरु असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला. ‘मी निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आहे. पोलीस इथे उपस्थित आहेत. कालपासूनच यांच्या हालचाली सुरु आहेत. त्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हे एकच घर नाही. अशी आणखी ८ ते १० घरं आहेत. हे पैसे किती आहेत ते मी मोजलेले नाहीत. आम्ही या पैशांना हात लावलेला नाही. पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे ताब्यात घ्यावेत. या प्रकरणाचा तपास करुन सोक्षमोक्ष लावावा,’ अशी मागणी आमदार राणे यांनी केली आहे.

    आमदार राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर टाकलेली धाड फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरुन लाईव्ह दाखवली. ‘आम्ही इथे येण्याआधी बंड्या सावंत यांनी बॅगला हात लावला. त्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत,’ असं राणे यांनी पोलिसांना सांगितलं. राणे बोलत असताना घरात उपस्थित असलेल्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर आमच्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत. निवडणूक लढवण्याची ही पद्धत नव्हे, अशा शब्दांत राणे यांनी त्यांना सुनावलं.
    Maharashtra Timesएकनाथ शिंदे म्हणाले, ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळाली’, फडणवीस म्हणतात, ‘लंका जाळतो म्हणणाऱ्यांकडे…’
    घरात आणखी ३ ते ४ बॅगा असल्याचा दावा आमदार राणे यांनी केला. ‘बंड्या सावंत किंवा विजय किनवडेकर, मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या पैकी कोणी तरी ती बॅग बाहेर आणावी.. मला कोणाच्या बेडरुममध्ये जायला आवडत नाही, असं लाईव्हच्या शेवटी आमदार राणे म्हणाले. निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर टाकलेली धाड आणि भाजपवर केलेले आरोप पाहता सेना, भाजपमधील वाद आणखी वाढण्याची चिन्हं आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा