Thane Body In Bag Case: ठाण्यातील देसाई गावात खाडी पुलाखाली एका तरुणीचा मृतदेह बॅगेत आढळून आला होता. त्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे.
देसाई खाडी पुलाखाली एका बॅगेत महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारी शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ आणि अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहाचले. त्यावेळी मातीच्या भरावावर आढळून आलेल्या एका बॅगेत महिलेचा मृतदेह अर्धवट बाहेर आल्याच्या स्थितीत दिसून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.
पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांची चार पथके स्थापन करण्यात आली होती. याविषयीची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली होती. त्याद्वारे पोलिसांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण माहिती मिळाली. ही माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी देसाई परिसरातून विनोद विश्वकर्मा (50) याला ताब्यात घेतले.
Nagpur Crime: याला मारून टाक; गर्लफ्रेण्डचा अबोला, माजी प्रियकराचा दुसऱ्या तरुणावर हल्ला, अन्…
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या विनोदसोबत मृत 22 वर्षांची तरुणी पाच वर्षांपासून राहत होती. 21 नोव्हेंबरला त्यांच्यात भांडण झाले. यातून विनोदने या तरुणीची गळा दाबून हत्या केली. नंतर तिचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून खाडी पुलावरून दिला.
एक दिवस खोलीमध्ये ठेवला मृतदेह
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतहे ट्रॉली बॅगेत मृतदेह भरल्यानंतर ही बॅग खोलीमध्येच ठेवली. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने दुसऱ्या दिवशी ही ट्रॉली बॅग घेऊन तो खाडी पुलाकडे गेला व बॅग पुलावरून फेकून दिली. ही तरुणी आरोपीला रेल्वे स्थानकावर भेटली होती. तो तिला सोबत घेऊन आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
