Panvel-Karjat Suburban Corridor: पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडोरचे २९.६ किमीचे काम अंतिम टप्प्यात असून, ८० टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, मुंबई आणि रायगड परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
कधी होणार पूर्ण?
पनवेल–कर्जत कॉरिडोर तयार करण्यासाठी सुमारे 2,782 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही चौथी मार्गिका तयार झाल्यावर, पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या 30 मिनिटांवर येणार आहे. प्रकल्प तयार झाल्यानंतर पनवेल, मोहोपे, चिखले चौक आणि कर्जत या पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा मिळणार आहे. ही मार्गिका मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Metro: मेट्रोच्या नेटवर्कमध्ये आणखी एका मार्गिकेची भर! वडाळा ते गेटवे होणार सहज प्रवास; कसा असेल मेट्रो 11 चा मार्ग?
थेट सीएसएसटी पर्यंत प्रवास
प्रवाशांना कर्जतहून पनवेलमार्गे हार्बर लाइनचा वापरून मुंबई ते सीएसएमटी पर्यंत सहज पोहोचता येणार आहे, ज्यामुळे कर्जत वासियांच्या प्रवासात अंदाजे https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/articlelist/2429656.cms25 मिनिटांची बचत होणार आहे. जलद लोकलने कर्जत ते सीएसएमटी प्रवासाला अवघे 2 तास लागता, धीमी लोकल ने तर हा प्रवास पूर्ण 3 तासांचा होतो. त्यात रेल्वेच्या नेहमीच्या खोळंब्यामुळे प्रवासाचा वेळ आणखीनच वाढतो. हा प्रकल्प पूर्ण होताच प्रवाशांचा वेळेची खूप बचत होणार आहे.
सध्या प्रकल्पाचे पायाभूत काम जवळपास पूर्ण झाले असून, तीन बोगद्यांचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. फ्लायओव्हरवरील गर्डर लाँच केले गेले आहेत आणि मोहपे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम यशस्वीरित्या पार पडले आहे. तसेच ट्रॅक आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिक (ओएचई) काम पूर्ण करण्यासाठी एमआरव्हीसीने बेलापूर–पनवेलदरम्यान मेगाब्लॉक घेतला होता, ज्यामध्ये ट्रॅकची बॅलास्टिंग आणि टॅपिंग कामे पूर्ण झाली.
विरोधक गेले की घोडेबाजार… बारामतीत आजही स्वाभिमानी लोक म्हणत युगेंद्र पवारांचं थेट उत्तर!
पनवेल–कर्जत कॉरिडोरमुळे नवी मुंबई, रायगड आणि आसपासच्या भागातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल. मुंबई व उपनगरातील वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करता, या मार्गिकेमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल–कर्जत प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी मोठे पाऊल ठरेल.
