मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे. ते मुंबई महापालिकेत भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांचे कार्यालय घेणार आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्याकडे मुंबई शहरचं पालकमंत्रिपद आहे. शिंदे यांच्या आधी भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबई शहरचं पालकमंत्रिपद होतं. २०२२ च्या मध्यापासून ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत लोढा मुंबई शहरचे पालकमंत्री होते. त्यांनी २०२३ मध्ये मुंबई महापालिकेत कार्यालय सुरु केलं. ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हापासून लोढा यांचं मुंबई महापालिकेतील कार्यालय बंद आहे.
दोन अलिखित नियम मोडीत, भाजपनं नेत्यांची फौज उतरवली; भाईंचा ‘तो’ अंदाज चुकतोय?
लोढा यांच्यानंतर शिंदे यांच्यानंतर मुंबई शहरचं पालकमंत्रिपद आलं. त्यामुळे आता ते मुंबई महापालिकेतील लोढा यांनी वापरलेलं कार्यालय आपल्याकडे घेतील. शिंदे यांचे कर्मचारी या कार्यालयात बसतील आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील. त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत या कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी बसणार नाहीत. शिवसेनेचे आमदार, खासदार या कार्यालयात आठवडाभर हजर असतील.
सुत्रांच्या माहितीनुसार, शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन २ डिसेंबरच्या आसपास होईल. सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात येऊन कार्यालयाची पाहणी केली. कार्यालय लवकरात लवकर सुरु करण्याची सूचना शिंदे यांनी केल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.
फडणवीसांचा थेट पंगा, शिवसेनेला अनपेक्षित धक्का; शिंदेंनी थेट राजीनामा काढला, काय घडलेलं?
‘आम्ही कार्यालयाची पाहणी केलेली आहे. पुढील आठवड्यात कार्यालय सुरु करण्यात येईल. औपचारिक उद्घाटनाची वाट पाहू नका. लोकांच्या समस्या तातडीनं सोडवण्यास सुरुवात करा, अशा सूचना शिंदेजींनी केल्या आहेत,’ अशी माहिती पदाधिकाऱ्यानं दिली. कार्यालय लवकरात लवकर सुरु करुन लोकांच्या अडचणी दूर करण्यात येईल, असंही या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.
