Mumbai Metro 11: मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मेट्रो 11 प्रकल्प मंजूर झाला आहे. गेट वे ऑफ इंडिया ते वडाळा या मार्गावर मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पासाठी 23,487.51 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
मेट्रो 11 ही गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा असा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर करणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 23,487.51 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मार्गिकेचा विस्तार, मेट्रो डेपो निर्माण आणि इतर संबंधित कामांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रो 4/4A (वडाळा–कासारवडवली–गायमुख) या मार्गिकेचा विस्तार करून वडाळ्यापासून गेटवेपर्यंत जोडणी करण्यात येणार आहे.
दोन्ही विमानतळे आता फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर! मेट्रो 8च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास होणार सोपा; कुठे असणार स्थानके?
हा मार्ग एकूण 14.51 किमी लांबीचा असून, त्यावर 14 स्थानके असतील. यापैकी 13 स्थानके भूमिगत तर 1 स्थानक अॅट-ग्रेड असेल. हे काम राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण होणार आहे. ही मार्गिका वडाळा–शिवडी–फिरोजशाह मेहता रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–काळा घोडा मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचेल.
मेट्रो 11 कार्यान्वित झाल्यानंतर दक्षिण मुंबईत प्रवास करणे अधिक सोपे आणि जलद होईल. सध्या मेट्रो 4/4A चे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचा विस्तार मंजूर झाल्यामुळे पुढील काही वर्षांत शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई लोकलवरील भारही लक्षणीय कमी होऊ शकतो.
…अन् उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांतून ओघळले अश्रू! नेमकं काय घडलं?
सध्या मुंबईत 89 किमी मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. भविष्यात हे जाळे 337 किमी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एकूण 16 मेट्रो मार्गिका उभारण्याचा आराखडा असून, यामुळे मुंबईचा संपूर्ण वाहतूक अनुभव ‘स्मार्ट’ आणि आधुनिक होणार आहे.
