Nashik Sinnar Bus Accident : सिन्नर बसस्थानकावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने एका चिमुकल्या आपला जीव गमवावा लागला, असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या भीषण अपघातात गौरी योगेश बोऱ्हाडे यांचा 9 वर्षीय मुलगा आदर्श बोऱ्हाडे, ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव आणि विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव आदी प्रवासी बसखाली आले. या धडकेत आदर्श बोऱ्हाडे (वय 9) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर तीनजण हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा CCTV समोर आला आहे. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अधिक उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बसचालक याला ताब्यात घेतलं असून सिन्नर पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Local : सख्ख्या मामानं 16 वर्षीय भाचीला मुंबई लोकलमधून ढकललं, कारण समोर येताच नातेवाईकांसह सगळेच हादरले
दरम्यान, अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केलं. जखमींना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, रस्त्यातच आदर्शने प्राण सोडले. आईसह अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसचालकाला ताब्यात घेतलं. अपघाताचं कारण ब्रेक फेल असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत असलं तरी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाबद्दल चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. या हृदयद्रावक घटनेनं सिन्नर परिसरात शोककळा पसरली आहे.

