Sharad Pawar On Bihar Electon Results: बिहार निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला आहे. दोनशे पार करणाऱ्या एनडीए भाजपच्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्याच्या हातात सत्ता आहे. त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचं, ही भूमिका घेतली तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल, याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे.
Latur News: भयंकर! कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना महिलेचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणाने घेतला जीव, कुटुंबियांचा आरोप
निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने हव्यात. याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. मात्र दहा दहा हजार रुपये वाटणं ही काय लहान रक्कम नाही. याचा परिणाम असा होतो की, मी एकेकाळी बारामती बघत होतो बारामतीचे वैशिष्ट्य असं आहे की, 50 वर्षांपूर्वी नगरपालिकेची निवडणूक आली की, मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट बघायची. कशासाठी वाट बघायचे हे काय सांगायची गोष्ट नाही. ते वाटून झालं की निवडणुकीचा निकाल काय लागलाय हे कळायचं, हे लहान प्रमाणात होतं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
देशामध्ये सध्या सर्वच राज्यात 50 टक्के मतदान हे महिलांचं आहे. त्यांना दहा-दहा हजार रुपये देणं आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणं, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात होतात का? याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले आहेत.
स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?
कुठे कुठे युती झाली आहे मला माहित नाही, माझ्या पक्षापुरते मी सांगतो की, आमच्यात अशी चर्चा झाली आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही पक्ष म्हणून जात नाही. त्या त्या तालुक्यात जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. हा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

