• Thu. Mar 19th, 2026

    उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 15, 2025
    उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनीचा उद्योग विभागासोबत ५ हजार १२७ कोटींचा करार

    नागपूर, दि.१५ : राज्य शासनाने उद्योगांसाठी पुरक असे लॉजिस्टिक धोरण आणले असून उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळच्या सोयी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. एक्सएसआयओच्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचे लॉजिस्टिक हब बनविण्याच्या दिशेने गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत पाच हजार 127 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

    मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महार्गालगत वडगाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कचे भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  आमदार समीर मेघे आणि डॉ. आशिष देशमुख, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अबलगम, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल, ब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख आदी यावेळी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्रिटिशांनी नागपूरला भौगोलिकदृष्ट्या झिरो माईल हे मध्य भारताचे केंद्र बिंदू म्हणून घोषित केले होते. आता हे शहर देशाचे लॉजिस्टिक हब होण्याच्या मार्गाने पुढे जात आहे. एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून या कार्यास गती मिळेल. नागपूर हे नागरी विमान क्षेत्रातही पुढे जात आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या या शहरात दररोज होत आहे. समृद्धी महामार्गामुळे उद्योग क्षेत्रातील दळणवळास चालना मिळाली आहे.

    समृद्धी मार्गालगतच एक्सएसआयओ हा 700 कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे.  आज 105 एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील 1100 कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे. या दोन्ही टप्प्यातून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच जागतिकस्तरावर पोहविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असुन समृद्धी मार्गावरील इगतपुरी भागातून वाढवण बंदरापर्यंत जोडण्याचे काम सुरू आहे. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन लॉजिस्टिकचा आणि ब्लॉकचेन ची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मकबदल घडविण्याच्या दृष्टीने कार्य करत आहे. एक्सएसआयओ राज्यात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत पाच हजार 127 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गुंतवणुकीची ही रक्कम तीन हजार कोटींनी वाढवून आठ हजार कोटी करण्यात येईल, अशी घोषणा एक्सएसआयओ व ब्लॅकस्टोन कंपनीच्यावतीने करण्यात आली.

    तत्पूर्वी, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आणि ब्लॅकस्टोन कंपनीचे तूहीन पारेख यांनी मनोगत व्यक्त केले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed