• Tue. Mar 10th, 2026

    ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 10, 2025
    ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत – महासंवाद




    मुंबई, दि.10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनवरील ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता; तसेच आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 12, 13, 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

    निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली असून, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल; तसेच ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असेल.

    राज्यातील स्थानिक स्वराज्‍य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त, वाघमारे यांच्याशी या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे.

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत समाजमाध्यम हँडल्स्‌

    X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

    Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

    YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

    0000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed