Beed Accident News: इंडिकाने धडक दिल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून ज्यांनी हा अपघात पाहिला त्यांना मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, माजलगावपासून पाच किमी अंतरावर असलेल्या केसापुरी येथील रहिवासी ओंकार जाधव आणि भाटवडगाव येथील त्याच्या साथीदार शेख अमिर इलाही (वय 25) हे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ऑटो रिक्षामध्ये बसून सादोळ्याकडे कामानिमित्त जात होते. यावेळी देशमुख पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या इंडिकाने धडक दिल्याने ऑटो रिक्षा चालवत असलेला शेख अमिर इलाही हा इंडिकाच्या खालील भागात अडकला.
Nilesh Ghaiwal: साळवे कुटुंबावर हल्ल्याचा मास्टरमाइंड नीलेश घायवळ; पुण्यातील कुख्यात गुंडाचा कट उघड
आपल्या गाडीला अपघात झाला आहे, हे लक्षात येताच इंडिका चालकाने आपली गाडी आणखी सुसाट पळवायला सुरूवात केली. त्यामुळे गाडीखाली अडकलेला यात अडकलेला शेख अमीर इलाही हा तब्बल दीड किमी फरफटत आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली, ही घटना पाहणाऱ्यांच्या किंचाळ्या निघाल्या.
यावेळी घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी शेख अमीर इलाही याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. यावेळी शेख अमीर इलाही याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तर, त्याचा साथीदार ओंकार जाधव याला खाजगी रुग्णालयात उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. शेख अमीर इलाही याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

