Nandurbar School Bus Accident : नंदूरबारमध्ये स्कूल बस दरीत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बसमध्ये एकूण 20 ते 30 विद्यार्थी होते, अशी माहिती आहे. त्यामुळे या घटनेनंतर नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सातपुडा पर्वतच्या दुर्गम भागातून विद्यार्थी नंदुरबारमध्ये शाळेत जातात. अशाप्रकारे स्कूल बसमध्ये मुलं शाळेत जात होती. या दरम्यान देवगोई घाटात चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही स्कूल बस थेट शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर विद्यार्थ्यांनादेखील गंभीर इजा झाल्याची माहिती आहे.
ऐतिहासिक भिवगड किल्ल्याच्या काही भाग कोसळला, दुर्गप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी
घटनेनंतर बचावकार्यासाठी प्रशासन पोहोचत आहे. पण या घटनेमुळे सातपुड्यातील रस्त्यांची जी दुरावस्था आहे त्याचा प्रश्न पुन्हा एकदा गडद झाला आहे. रस्ता खराब असल्याने चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याचा अंदज वर्तवला जात आहे. उद्या सोमवार असल्याने स्कूल बस शाळेच्या विद्यार्थ्यांना सातपुड्याच्या दुर्गम भागातून घेऊन येत होती. या दरम्यान ही अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण नंदूरबार जिल्हा हादरला आहे.
Parth Pawar: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे विधान, दोषी आढळल्यास… नेमकं काय म्हणाले?
नंदुरबारमध्ये दुर्गम विद्यार्थी नवे स्वप्न घेऊन शाळेत जातात. पण इथे स्कूल बस आणि शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप आता पालकांकडून होत आहे. स्कूल बसमध्ये मर्यादेपक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवलं जातं. विद्यार्थ्यांना अक्षरश: या स्कूलबसमध्ये कोंबलं जातं. याबाबत शाळा प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जातो, असा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय. आज जी दुर्घटना घडली या घटनेनंतर तरी काही उपाययोजना होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

