fake police case: फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बनावट नावाने महिलांना फसवून दागिने आणि पैसे लुबाडणारा एक आरोपी भिगवण पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अकलूज परिसरातून त्याला अटक करण्यात आली.
आरोपीचे संपूर्ण नाव गणेश शिवाजी कारंडे आहे पण तो गुन्हे करताना कधी, तो फेसबुकवर ‘संग्राम पाटील’ तर कधी ‘पृथ्वीराज पाटील’ या नावाने वावरत असे. बनावट नावांनी प्रोफाइल तयार करून स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत असे. या प्रकारातून त्याची योजना असायची की महिलांचा विश्वास संपादन करणे, व त्यानंतर या महिलांकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुबाडायची.
ऊस दरवाढीचं आंदोलन चिघळलं, पोलिसांसह वाहनांवर शेतकऱ्यांची दगडफेक; बेळगावमध्ये तणाव
यामध्ये एका महिला जी व्यावसायिक आहे, ती या बनावट अधिकाऱ्यावर विश्वास ठेऊन फसली. व्यावसायामध्ये आपल्याला याची काही मदत होईल अशी अपेक्षा ठेऊन महिलेने गणेशवर विश्वास ठेवला होता, पण गणेशने तिच्याकडून दागिने आणि पैसे घेऊन महिलेबरोबर जबरदस्तीचे शारीरिक संबंध ठेवले असा गंभीर गुन्हा गणेशवर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे या बनावट पोलिसाच्या गुन्ह्याची गंभीरता लोकांना संताप आणून देणारी ठरते आहे
भिगवण पोलिसांच्या विशेष पथकाने या आरोपीकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले असून, आरोपीवर यापूर्वी अकलूज, मंगळवेढा, पंढरपूर आणि लोणंद या ठाण्यांमध्ये महिलांवरील अत्याचार तसेच फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यामुळे या घटनांचा गंभीरतेने विचार करण्यात आलेला आहे आणि आरोपीच्या वर्तनावर कटाक्ष टाकण्यात आला आहे. ही कारवाई भिगवण पोलिस ठाण्याच्या पथकाने शुद्ध नियोजनाने आणि सजगतेने केली आहे.

