Varandha Ghat Accident : रायगडमधील वरंधा भोर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. एक दुचाकीस्वार 100 फुट खोल दरीत कोसळ्यानं त्यांचां जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
खडताळ पुलावर अपघात
रायगड जिल्ह्यातील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशीच एक भीषण दुर्घटना अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या खडताळ पुलावर 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री उशिरा घडली होती. स्कूटी आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोघं तरुण गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान स्कूटीचालक सागर राजेंद्र जोशी (वय 25, रा. गोंधळ पाडा, अलिबाग) याचा आज पहाटे पनवेल येथील एम.जी.एम. रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Satara Crime: सातारा डॉक्टर तरुणी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; PSI गोपाळ बदनेला आयुष्यभराची अद्दल
पहाटे उपचारादरम्यान मृत्यू
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेनं दोघांनाही अलिबाग ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र, स्थिती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल एम.जी.एम. रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यापैकी सागर जोशी याने उपचारादरम्यान प्राण सोडला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे खडताळ पूल परिसरात सिग्नल, स्पीडब्रेकर आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी पुन्हा केली आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

