The Asiatic Society of Mumbai President Election : द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदाच्या पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी मराठी व्यक्ती निवडून आल्यास संस्थेचा कारभार पुन्हा योग्य मार्गावर येईल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
करोना काळापासून द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. तसेच संस्थेतून गहाळ झालेली पुस्तके, संस्था चालवण्यासाठी निधी मिळवण्यासाठी अपेक्षित हालचाल न करणे यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामध्ये अमराठी व्यक्तींच्या हातात असलेल्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी मराठी व्यक्ती निवडून आल्यास संस्थेचा कारभार पुन्हा योग्य मार्गावर येईल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विठ्ठल नाडकर्णीही होते. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता केतकर विरुद्ध सहस्रबुद्धे अशी थेट निवडणूक होणार आहे.
संस्थेच्या उपाध्यक्षपदाच्या चार पदांसाठी १३ जण रिंगणात आहेत. ए. डी. सावंत, अर्जुन डांगळे, अरुण शंकर, चंद्रप्रकाश द्विवेदी, दीपक पवार, नितीश भारद्वाज, नॉबी पेरीयमर, रमेश पतंगे, रेणू पारेख, संजय देशमुख, शर्मिष्ठा मुखर्जी, सुनील कदम आणि उषा विजयालक्ष्मी उपाध्यक्षपदासाठी लढत देतील. सचिवपदासाठी सी. एम. पॉलसिल आणि विवेक गणपुले रिंगणात आहेत.
Rohit Arya : मुलांना दहा मिनिटे भेटून घ्या, रोहित आर्याचा सकाळी 9.45 ला मेसेज, जळगावच्या शिक्षकाने लेकीला टाटा केलं अन्…
छाननी समितीसाठी अर्ज
या निवडणुकीसोबतच २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी छाननी समितीच्या सात जागांसाठी अभिजीत मुळ्ये, अमोल जाधव, अनाहिता तारापोर, अनिल सावंत, अंजली मसरगप्पी, दत्तात्रय पंचवाघ, देवदत्त मालशे, माधवी, मल्हार गोखले, पंकज समेळ, स्नेहा नगरकर, उमंग काळे यांनी अर्ज दाखल केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनचालक पोलिसांच्या कचाट्यात, द. मुंबईत वाहतूक पोलिसांनी ताफ्याचा माग काढला, इतक्यात…
१६ जण रिंगणात
व्यवस्थापन समितीपदासाठी सहा जागा असून यासाठी १६ जण लढत देत आहेत. यामध्ये सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी पाच पदे तर २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी एक पद अशा सहा पदांसाठी निवडणूक होत आहे. भरत गोठोसकर, इब्राहिम अफगाण, कुंदा प्रमिला नीळकंठ, माधव भंडारी, मल्हार कुलकर्णी, नंदिनी आत्मसिद्ध, प्राची मोघे, प्रमोद बापट, राजेश बेहेरे, रमा बिष्णोई, रामचंद्रन व्यंकटेश, सविता सुरी, सुनंदा भोसेकर, स्वाती दाते, उर्वशी, व्ही. एम. चक्रवर्ती हे १६ उमेदवार आहेत.

