Solapur News : पोलिसांना खबर लागली की मुंबई-पुणे-सोलापूर या शहरांमधून काहीतरी साखळीतून येत आहे. पोलिसांनी आणखी माहिती काढली आणि शेवटी छाप टाकायचं ठरवलं, त्यानंतर काय समोर आलं जाणून घ्या.
पोलिसांचा कसून तपास सुरू-
सोलापूर शहर पोलिसांनी मोहम्मद अझहर कुरेशीला ड्रग्ज विक्री करण्याअगोदर सोलापूर बसस्थानकातून ताब्यात घेतले आहे. अजहर कुरेशी आहे हा यापूर्वी देखील एमडी ड्रग्ज घेऊन सोलापुरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यापूर्वी अजहर कुरेशीने ड्रग्ज कोणाला दिले होते? याचा कसून तपास सुरू आहे. यावेळी कुरेशी ड्रग्ज कोणाला द्यायला आला होता? याचाही तपास सुरू आहे. ज्या व्यक्तीला तो ड्रग्ज देणारा होता, त्याच्यासोबत मोहम्मद अझहरने व्हॉट्सअॅपवरून कॉल केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्यातून अनेक गुपिते उलगडू शकतात,
फॉरेन्सिक टीमकडून तपासणी-
संशयित आरोपी कुरेशीकडे सापडलेल्या पांढऱ्या रंगाची पावडरची फॉरेन्सिक टीमने तपासणी केली असता ते लाल मेफेड्रोन ड्रग्ज (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपीने मुंबईहून ही पावडर आणल्याचे कबूल केले.फौजदार चावडी पोलिसांत एनडीपीएस अॅक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

