राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने बळीराजा मोठ्या संकटात आहे. शेतात गुडघाभर पाण्यात उभी पीकं आडवी झाली. अशात शेतकऱ्यांकडून कर्जमाफी देण्याची, तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून नुकसान भरपाई दिली गेली आहे, मात्र ती तुटपुंजी आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्याकडून आंदोलन सुरू आहे. अशात आता सरकार या आंदोलनानंतर कर्जमाफी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
