• Mon. Jun 15th, 2026

    Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला

    Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला

    जळगावच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केल्याचं वृत्त ताजं असतानाच, आता यावल नगरपरिषदेच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा छाया पाटील यांनी पती अतुल पाटील यांच्यासह जळगावात भाजपच्या कार्यालयात जावून मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच जळगावात काही अनपेक्षित घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या. मंत्री गिरीश महाजन हे आज जळगावमध्ये आहेत. ते जळगावमधील भाजपच्या कार्यालयात उपस्थित आहेत. असं असताना यावल नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अतुल पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचीदेखील माहिती आहे.

    अतुल पाटील यांची गिरीश महाजन यांच्यासोबत तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने गिरीश महाजन यांची अचानक भेट घेत तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांची का भेट घेतली? या मागचं कारण सांगितलं आहे.

    छाया पाटील नेमकं काय म्हणाल्या?

    “आमचं वैयक्तिक काम होतं. हॉस्पिटलच्या कामानिमित्त आलो होतो. विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराला पाठिंबा देणार. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मतदानाबाबात आम्हाला काहीही आवाहन करण्यात आलेलं नाही”, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा छाया पाटील यांनी दिली.

    25 वर्षे भाजपात काम केले, अतुल पाटील काय म्हणाले?

    “छाया पाटील यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. “आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही शंभर टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करु. मी सुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. आम्ही या ठिकाणी वैयक्तिक कामानिमित्त आलो होतो. आमचे मित्र चंद्रकांत बाविस्कर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना सहज फोन केला. ते म्हणाले की, कार्यालयात भेट द्यायला या. गिरीश भाऊ इथे उपलब्ध आहेत. त्या निमित्ताने या ठिकाणी आलो”, असं अतुल पाटील यांनी स्पष्ट केलं.

    “आमच्या कामांच्या संदर्भात प्रत्यक्ष गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली. मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये आमचा पेशंट दाखल आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. सोमवारी किंवा मंगळवारी मी पुन्हा त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी फोन करेन, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. पक्ष वेगळे असले तरी वैयक्तिक संबंध असतात. मी भाजपमध्ये 25 वर्षे काम केलं. मधला कालखंड सोडला तर भाजपात अनेक वर्ष सक्रीय काम केल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासोबत संबंध आहेत”, असं अतुल पाटील म्हणाले.

    “गिरीश महाजन यांच्या भाजपचे विधान परिषदचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे मागच्या आठवड्यात माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी माझ्या गटातील 13 नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक उमेदवार मत मागत असतो. त्याप्रमाणे ते आले. मी देखील त्यांना सांगितलं की, आपण त्याबाबत विचार करु. पण आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. मविआच्यावतीने आम्हाला सूचना येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मविआला मतदान करणार”, असं अतुल पाटील यांनी सांगितलं.

    गिरीश महाजन यांची भेट का घेतली?

    “यावल नगर परिषदेच्या माध्यमातून आज 56 कोटींचं शेळगाव बरेजची योजना यावलमध्ये झालेली आहे. त्याची वर्क ऑर्डर निघाली आहे. तीस टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिलेली असल्यामुळे शंभर टक्के निधीचा प्रश्न येत नाही. अन्य काही योजनांबाबत गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. मी वेगळा पक्षाचा असलो तरी त्या मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहेत. नागरिकांचे काम झाले पाहिजे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली”, अशी माहिती अतुल पाटील यांनी दिली.

    भाजपमध्ये घरवापसी करणार का?

    “भाजपमध्ये घरवापसीचे दुरान्वये संबंध नाही. मी आहे त्या ठिकाणी योग्य आहे. अनेक वर्ष मी भाजपात काम केलं. पण स्थानिक नेत्यांपैकी काही लोकांशी माझं पटत नसल्याने मी बाजूला झालो. मी सक्षमपणे काम करतोय. जळगाव जिल्ह्यात भाजपची मोठी लाट असताना आम्ही जिंकून आलो. आमच्या पाठीमागे यावलची जनता आहे”, असं अतुल पाटील यांनी सांगितलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा