Uddhav Thackeray On ECI: उबाठा शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंनी आज निर्धार मेळाव्यात निवडणूक आयोगालाही धारेवर धरले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने चुका दुरुस्त कराव्या आणि मग निवडणूक घ्यावी असंही म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंनी या भाषणात भाजप आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केलेलं पाहिलेलं मिळालं आहे. त्यांना ओरबाडायचं आहे. संपवून टाकायचं आहे, यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. आपल्यावर जर हुकूमशाही नको असेन तर हीच वेळ आहे.निवडणूक आयोगाला परत सांगतो, चुका दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला निवडणुका घेता येणार नाहीत. आम्ही दोन आयुक्तांना भेटलो, त्यांनी आम्हाला राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्यास सांगितलं. आम्ही दोघांना एकत्र भेटलो, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
‘मुंबई गिळायला ॲनाकोंडा मुंबईत आला होता’; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर हल्लाबोल, म्हणाले, ‘नाही तुझं पोट फाडून…’
या मुद्दावर ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेमध्ये यश मिळालं, विधानसभेत 20 जागा? हरू शकतो आपण. मी कोव्हिडमध्ये मुस्लिमांसह सर्वांबरोबर समानतेने वागलो. तो मतदार माझ्याशी उरफाटा वागून शकत नाही. हा मतदारांचा कौल नाही. हा यांच्या पैशांचा माज आहेय उद्या यांचे चटर फटर लोक चिरकतील, चिरकू द्या, उत्तरं देऊ नका. त्यांना त्याचा पगार मिळतो. ते आपल्याला डिस्टर्ब करतात. ते नामर्द आहेत म्हणून आपल्याच लोकांना तोडून फोडून आपल्यावर पाठवत आहेत. आपल्याच दोन माणसांमध्ये भांडणं लावत आहेत. ही भाजपची अवसानघातकी पद्धत आहे. अंधभक्तांना सांगतो डोळ्यांवर पट्टी घालून जाऊ नका. पट्टी उघडेल तेव्हा कळेलं, घराण्याचं घराणं खाईत पडलेलं असेल. निवडणूक यादीमध्ये दोन गोष्टी असतात. फ्रॉड आणि फॉल्स. चूक होऊ शकते, पण हा फ्रॉड आहे. असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केला आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावरही जहरी टीका केली आहे. त्यांनी अमित शाहा हे अॅनाकोंडा आहेत, असं म्हणत मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे, असं म्हटलं आहे.

