Phaltan Gopal Badne Remanded Five Day Police Custody : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदणेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिला आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासे
फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा काल पंढरपुरात शोध घेतला जात होता. निलंबित पीएसआय गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती मिळाली होती. काल शनिवारी रात्री गोपाल बदने याचं पंढरपुरात लोकेशन आढळल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला होता. काल पहाटेच्या सुमारास प्रशांत बनकर पोलिसांना सापडला, त्याला पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून ताब्यात घेतलं त्यानंतर रात्री उशीरा बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला.
Akola News : पडक्या घराजवळून जाताना अनर्थ, 8 वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर भिंत कोसळली; एकुलता एक लेक गेल्यानं आई-वडिलांचा आक्रोश
डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने काल रात्री उशीरा थेट पोलीस चौकीत हजेरी लावली. बदने सोलापुरातील काही पोलिसांच्या सोशल मीडियावरून संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. बदनेच्या कुटूंबायांना त्याला हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याचं कळल्यानंतर बदने पोलीस चौकीत हजर झाला अशी माहिती आहे. यासंबंधीचं वृत्त एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
Nagpur Crime : कारवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षाला धडक, कुख्यात गुंडांना बोलावून चालकाला बेदम मारहाण; हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच…
अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडला
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत पीएसआय बदने याने तोंड उघडलं. तो तपास अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडल्याची माहिती आहे. त्याने आपण महिला डॉक्टरवर कसल्याही प्रकारे अत्याचार केला नाही, असं पोलिसांना सांगितलं आहे. शिवाय त्याने इतरही काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या. पण संबंधित डॉक्टरसोबत त्याचे काही संबंध होते का? किंवा दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याबाबत बदनेने अद्याप मौन बाळगल्याची माहिती आहे.

