Mumbai News: सोमवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या ‘भारत सागरी सप्ताह’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत यासंबंधी सामंजस्य करार होणार आहे.
मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई बंदर प्राधिकरण स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. प्राधिकरणाने आता मुंबईच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल सुरू केले असून, त्यासंबंधी अन्य उपक्रमही हाती घेतले आहेत. यामध्येच किनारपट्टीपासून समुद्रात ५२३ मीटर अंतरावर १४ हेक्टरवर ‘मरिना’ उभारला जाणार आहे. या ‘मरिना’चा प्रवेश भाऊचा धक्का परिसरातूनच असेल.
Weather Update: पुढील दोन पावसाचे; मुंबईसह कोकणात कोसळधारा, IMDकडून यलो अलर्ट, मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा
१०० टक्के खासगी विकासकाच्या माध्यमातून ‘मरिना’ची उभारणी होणार आहे. त्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा जाहीर केली आहे. एकदा ‘मरिना’साठीचे कंत्राटदार ठरल्यानंतर त्या ठिकाणी आलिशान हॉटेल, पंचतारांकित रेस्तरॉ, बँका, एटीएम केंद्र, ‘मरिना’वर आलेल्यांना मुंबईत नेण्यासाठीच्या कॅबचा तळ, बहुमजली वाहनतळ, बँक्वेट हॉल, क्लब हाउस, लॉन, व्यवसाय केंद्र, तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट, कन्व्हेन्शन केंद्र, बोटींच्या देखभाल व दुरुस्तीची केंद्रे, सीमा शुल्क तपासणी कार्यालय अशा अन्य प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारल्या जाणार आहेत. यासाठी ४१७ कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काळात होणार आहे. हा ‘मरिना’ समुद्राच्या आतमध्ये उभारला जाणार आहे. त्यासाठी तेथे भिंत उभी करून लाटा रोखल्या जाणार आहेत. ही भिंत १,४७७ मीटर लांब व ४.८० मीटर रुंद असेल. लहान-लहान खांबांच्या माध्यमातून भिंत उभी केली जाईल.
Raj Thackeray: न भूतो न भविष्यती, दिल्लीही दखल घेईल असा मोर्चा निघावा; राज ठाकरेंचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश
424 याट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय
मरिना’अंतर्गत एकूण ४२४ यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय असेल. या बोटींची कमाल लांबी ३० मीटर किंवा त्याहून कमी असेल. मरिना ही संकल्पना प्रामुख्याने अमेरिका किंवा समुद्री क्षेत्रात पुढे असलेल्या नेदरलँड्स, डेन्मार्क या देशांमध्ये आहे. घारापुरीची बेटे, बेलापूर किंवा नवी मुंबई, मांडवा, तसेच भविष्यात नवी मुंबई विमानतळासाठी जलमार्गाने ये-जा करणारे स्वत:ची बोट या ठिकाणी उभी करू शकतील. हा एक प्रकारे लहान बोटींचा समुद्रातील तळ असेल.

