मुंबई -प्रतिनिधी
त्यांच्या या वक्तव्यावरुन आता विरोधकांनी बावनकुळे आणि भाजपला टार्गेट केलं आहे. हा विषय फक्त भाजप कार्यकर्त्यापूरता नसून विरोधकांचेही फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय आता काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपला धारेधवर धरले आहे.
फोन टॅप करण्याच्या प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेमधील त्यांच्याच मित्रपक्षांवर भाजप पाळत ठेवत आहे. माबाईल सर्विलन्सवर टाकणे हे भाजपसाठी नवीन नाही. भाजपने यापूर्वीही पेगॅसेससारखे प्रकार केले आहेत. राज्यात रश्मी शुक्ला या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन जवळपास 50 नेत्यांचे फोन बेकायदेशिरपणे टॅप केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पण, फडणवीस सत्तेत आले की पुन्हा शुक्लांना पोलीस प्रमुखपदी बढती मिळाली.
फोन टॅपिंगवर पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की, “भाजपवाले आते विरोधकांच्या बाथरुम, संडासमध्येही कॅमेरे लावायला मागेपुढे पाहणार नाही, कारण ते संस्कृती सभ्यतेच्या पुढे गेले आहेत. ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे. चंद्रशेखर बावनकुळे आता लवकरच त्यांच्या विधानावर घुमजावही करतील.”, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर म्हणाले…
एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली, ही घटना पोलिस विभागाला लाज आणणारी आहे, गृहविभागाची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृहविभागावर नियंत्रण नाही. याची लाज बाळगून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहीजे, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या, अशी टीका हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
