Man assaults his daughter: कोल्हापूर जिल्ह्यात बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील एका गावात वडिलांनीच आपल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील एका गावात संशयित आरोपी आपल्या कुटुंबासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्याच मुलीसोबत गैरवर्तन सुरू करायला सुरुवात केली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर तात्काळ करवीर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली होती.
Kolhapur News : रस्त्याच्या मधोमध प्राण्याचं काळीज ठेवून अघोरी प्रकार, कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
पोलिसांनी तात्काळ केली कारवाई
पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच तातडीने कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, “तेरा वर्षीय मुलीवर खुद्द बापानेच लैंगिक अत्याचार केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.” या प्रकरणाचा अधिक तपास करवीर पोलिस ठाण्याचे पथक वेगाने करत आहे.
समाजात संतापाची लाट
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नात्यालाच काळीमा फासणाऱ्या या अमानुष प्रकाराबद्दल नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि अशा प्रकरणांवरील कारवाई अधिक कठोर व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शिवकालीन वाघनखांच्या प्रदर्शनाबाबतच्या परिपत्रकामुळे गोंधळ, कोल्हापुरात काय घडलं?
गुरगावमध्येही अशीच एक घटना
दरम्यान, गुरगावच्या फरिदाबादमध्येही नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. येथील एका 42 वर्षीय रिक्षाचालकाने स्वत:च्या 14 वर्षीय लेकीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीला व्यसनी असल्यामुळे काही दिवासंपूर्वीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यावेळी तिने लेकीला ही तिथेच सोडले. पत्नी जाताच पतीने रोज रात्री येऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तिने ही गोष्ट शेजारच्या एका वृद्ध महिलेला सांगितली, त्यानंतर वृद्धेने तिला पोलिसांकडे घेऊन जाऊन पित्याविरुद्ध तक्रार नोंदवली आणि भूपानी पोलीस ठाण्यात त्याला अटक करण्यात आली आहे.

