• Thu. Mar 12th, 2026

    माझं तुझ्यावर प्रेम; 28 वर्षीय राजेंद्र तरुणीच्या घरात घुसला, जवळीक साधली अन्…; नवी मुंबईत खळबळजनक घटना

    माझं तुझ्यावर प्रेम; 28 वर्षीय राजेंद्र तरुणीच्या घरात घुसला, जवळीक साधली अन्…; नवी मुंबईत खळबळजनक घटना

    Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील सानपाडा इथं एका तरुणीवर घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असून विरोध केल्यामुळे आरोपीने तरुणीवर लोखंडी सळईने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र सहानी व नुर हुसेन गाझी या दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

    तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: सानपाडा इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला असून आरोपीने विरोध करणाऱ्या तरुणीवर लोखंडी सळईने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सहानी आणि नुर हुसेन गाझी या दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेरुळ येथे राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने सानपाडा येथे राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला तरुणीने विरोध केला असता, आरोपीने तरुणीच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात पीडित तरुणी जबर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या तीन साथिदाराविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

    नेमकं काय घडलं?

    पीडित तरुणी व तिचा भाऊ दोघे घरी असताना 20 ऑक्टोबर रोजी आरोपी राजेंद्र सहानी हा त्याच्या तीन साथीदारांसह घरात घुसला. त्यानंतर राजेंद्र याने तरुणीला जागे करून त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत लगट करू लागला. तरुणीने त्याच्या या कृत्याला विरोध केला असता राजेंद्रने तिच्या डोक्यावर सळईने प्रहार केला. यावेळी पीडितेच्या भावालाही राजेंद्र याने बेदम मारहाण केली. बहीण-भावावर हल्ला केल्यानंतर सर्व जण पळून गेले. त्यानंतर पीडित तरुणीने सानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र सहानी आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी राजेंद्र सहानी व नुर हुसेन गाझी (19) या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यानंतर नोटीस देऊन दोघांना सो़डून देण्यात आले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा