Uttan – Virar Sea Link : मुंबईत आणखी एक सी-लिंक उभारला जात असून या सी-लिंकमुळे उत्तर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 55 किमीचा सी-लिंक वसई वाढवण बंदरालाही जोडला जाणार आहे.
हा सेतू सुरुवातीला वर्सोवा ते विरार, असा उभारण्याची योजना होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 32 हजार कोटी रुपयांत हा पूल उभारणीचं नियोजन केलं होतं पण नंतर हा पूल, प्रकल्प उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपवण्यात आला. त्यानंतर 32 हजार कोटीवरुन या पुलाचा खर्च 63 हजार 450 कोटी रुपयांचा झाला.
मीरा-भाईंदर ते नायगावपर्यंत मेट्रो कामाला विलंब, वसई खाडीवर डबल-डेकर पूल, MMRDA ची योजना
खर्च वाढल्यामुळे एमएमआरडीएने या खर्च वाढीचं स्वतंत्रपणे पुनरावलोकन करत अभ्यास सुरू केला. अभ्यास करताना हा सी-लिंक वर्सोव्यामार्गे उत्तनपर्यंत येणार असल्याचं ठरल्याने हा सेतू वर्सोव्याऐवजी उत्तन ते विरार असा निश्चित झाला. त्यात एकूण रस्त्यांची लांबी 39 किमीने कमी होऊनही प्रकल्प खर्च तब्बल 87 हजार 420 कोटी रुपयांवर गेला होता. इतक्या मोठ्या खर्चालाही एमएमआरडीएकडून मंजुरीही देण्यात आली होती.
मिठी नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, बीकेसी मार्गावर प्रवाशांना मोठा फायदा, कुठे असणार ब्रीज? वाहतूक कोंडी दूर होणार
इतक्या कोटींच्या भरमसाठ खर्चाबाबत जून महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली होती. त्या बैठकीत या सेतूच्या प्रकल्प खर्चाच्या निर्णायक कपातीचा निर्णय होऊन तो 52 हजार 652 कोटी रुपयांवर आणण्यात आला होता. या खर्चात 34 हजार 775 कोटींची कपात झाली. खर्चात कपातीचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा नव्या बदलांसह प्रकल्पाचा आराखडा तयार करुन तो सादर रण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी MMRDA ला दिल्या होत्या. त्यानुसार आता हा आराखडा अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती आहे.
कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पर्यायी वळण मार्गावरील पूल वाहून गेला, भयानक दृष्य!
वसईलाही जोडणार उत्तन-विरार सागरी सेतू
‘उत्तन-विरार सागरी सेतू’ विरार कनेक्टरमार्फत बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट जोडला जाईल. तिथूव पुढे तो प्रस्तावित वाढवण बंदराशीही जोडला जाणार आहे. तसंच सागरी किनारा मार्गाच्या अर्थात सी-लिंकच्या माध्यमातून वसईशीलाही संलग्न जोडला जाईल.

