Satara Doctor Crime News : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे.
महिला आयोगाने काय माहिती दिली?
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर ने पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत.
Mumbai Crime: दहा दिवसांपूर्वी ब्रेकअप, भेटायला बोलवून ‘एक्स’वर हल्ला, तरुणाने आयुष्य संपवलं, काळाचौकीत खळबळ
नामांकित हॉटेलमध्ये आयुष्याची अखेर
दरम्यान, फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरने शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आपल्या आयुष्याची शेवट केली. फलटण पोलिसांत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेने 4 वेळा अत्याचार केला आणि हवालदार प्रशांत बनकर ने मानसिक त्रास दिला असल्याचं डॉक्टरने स्वतःच्या हातावर लिहिलं आहे. सदर महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत होत्या. शहरातील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आपले जीवन संपवलं.

