महाराष्ट्राच्या राजकारणात आता मतदारांच्या याद्यांवरुन नवं राजकारण तापताना दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून बोगस मतदारांची नोंद झाल्याचा आरोप केला जातोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पक्षातील सर्वात सिनियर नेत्यांपैकी एक नेते आहेत. काँग्रेसमध्ये त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील ते बडे प्रस्थ आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. एक दिग्गज राजकारणी म्हणून त्यांची छवी आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं मानलं जातं. बाळासाहेब थोरात यांनी अनेक वर्ष संगमनेरचं प्रतिनिधित्व केलं. ते सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला.
बाळासाहेब थोरात यांचा पराभव होईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. ते दिग्गज नेते आहेत. शिवाय त्यांचं मतदारसंघात काम आहे. मतदारसंघातील नागरिकांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तरीही या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. थोरात यांचा पराभव होण्यामागे काही वेगळी कारणे असू शकतात. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निकालावर शंका उपस्थित केली आहे.
स्वत: बाळासाहेब थोरात यांनी यावेळी संगमनेरमध्ये 9500 बोगस मतदारांची नोंद असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अनेक जण दुबार आणि काही स्थानिक नसणाऱ्यांची नावे यादीत आहेत. निवडणूक आयोग बनवाबनवी करत आहे का? अशी शंका येत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
“संगमनेर मतदारसंघात साडेनऊ हजार दोष आम्ही दाखवून दिले. हे नावे दुबार आहेत, हे नाव चुकीचे आहेत. या साडेनऊ हजाराची कोणतीही पडताळणी करण्यात आलेली नाही. आम्हाला तहसीलदरांनी उत्तर दिलं आहे की, असं कोणतंही नाव वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही”, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
“एका बाजूला तुम्ही सांगता की, आम्ही आदेश दिला आहे. चुका दुरुस्त करणार आहोत. दुसऱ्या बाजूला सांगताय की, आम्हाला अधिकारच नाही. अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि हे अधिकारी करत आहेत का? ही शंका यावी अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे”, अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा