• Thu. Mar 12th, 2026
    Metro 2 B : मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार; नवी मेट्रो लवकरच सेवेत, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर… कुठे असणार स्टेशन्स? मार्ग कसा?

    Metro 2 B : मुंबईत ‘मेट्रो दोन ब’ मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार होतं. मात्र ते होऊ शकलं नाही. त्यामुळे मुंबईकरांना आता या मेट्रो मार्गिकेसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार होता. त्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. मात्र कामं पूर्ण न झाल्याने ते उद्घाटन हुकलं. पूर्व उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांचे डोळे मंडाळा-चेंबूर मेट्रोकडे लागले आहेत. पण आता ही मेट्रो सुरू होण्यासाठी, प्रत्यक्षात सेवेत दाखल होण्यासाठी नागरिकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. या मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे, मात्र, या मार्गावरील स्टेशनची कामं पूर्ण न झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारं या मेट्रोचं उ‌द्घाटन हुकलं आहे.

    कोणत्या मार्गावर धावणार ही मेट्रो?

    मंडाळा-चेंबूर मार्गावर धावणारी ही ‘मेट्रो दोन ब’ आहे. ही उन्नत मार्गिका मंडाळा ते ईएसआयसीनगर (अंधेरी प.) या मार्गावर धावेल. मंडाळा ते डायमंड गार्डन, चेंबूर असा या मार्गिकेचा पहिला टप्पा प्रस्तावित आहे. या पहिल्या टप्प्यातील सुरक्षा प्रमाणपत्र, त्यासंबंधी विविध परीक्षणं, तपासण्या पूर्ण झाल्या. तपासण्या पूर्ण झाल्यानंतर 15 दिवस आधीच मेट्रोसाठी सुरक्षा प्रमाणपत्रही मिळालं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएला हे सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे.
    Maharashtra TimesMetro 5 Thane Kalyan : ठाणे ते कल्याणपर्यंत धावणार मेट्रो, 292 बांधकामं पाडणार, कसा असेल Metro-5 चा मार्ग?

    मंडाळा-चेंबूर मेट्रो मार्गाचं उद्घाटन रखडलं

    आठ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा होता. त्यावेळी भुयारी मेट्रो ३ च्या मार्गिकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्याचवेळी भुयारी मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्यासोबतच या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचंही उद्घाटन होणार होतं. मात्र स्टेशनची कामं अर्धवट राहिली असल्याने या मेट्रोचं उद्घाटन होऊ शकलं नाही. या मार्गिकला मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांचं (सीएमआरएस) सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे.
    Maharashtra Timesमेट्रो, मोनो, लोकल, बस…कुठलंही तिकीट काढताना ‘मुंबई वन’ ॲपवर मिळेल 20 टक्के सवलत, प्रवाशांना मोठा फायदा; कशी-कुठे मिळेल सूट?
    हे प्रमाणपत्र स्टेशन्स आणि एकूणच मार्गिका प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित आहेत अथवा नाही, यासाठी असते. मात्र अद्याप स्टेशनच्या सजावटीसह इतर कामं पूर्ण झाली असली, उद्घाटन होऊ शकलं नाही. येत्या काळात ही कामं पूर्ण होऊ शकतात, अशी माहिती आहे. कोणत्याही मेट्रोच्या उद्घाटनावेळी मेट्रोची ध्वनिचित्रफीतही दाखवली जाते. या मंडाळा-चेंबूर मार्गाची ध्वनिचित्रफीतही उद्घाटनावेळी तयार नव्हती. त्यामुळेही उद्घाटन न करण्याचं, रखडल्याचं हेही एक कारण होतं.

    Thane Metro Trial Run LIVE : ठाणेकरांचे स्वप्न साकार, मेट्रो ४ ची ट्रायल; CM Fadnavis-Shinde LIVE

    सीएमआरएस प्रमाणपत्र महत्त्वाचे

    मेट्रो मार्गिका प्रवासी सेवेत येण्याआधी त्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) प्रमाणपत्राची गरज असते. या प्रमाणपत्रासाठी पहिल्या टप्प्यात सीएमआरएसचं पथक परीक्षण करतं. त्यात दिलेल्या सूचनांच्या आधारे बदल केल्यानंतर अंतिम परीक्षण होतं. ‘मेट्रो दोन ब’बाबत ही दोन्ही परीक्षणं पूर्ण होऊन सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्रही मिळालं आहे. वास्तवात पंतप्रधान मोदी यांच्याकडून झालेल्या भुयारी मेट्रो – 3 च्या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनासह या मेट्रोचंही उद्घाटन होणार होतं, पण ते रखडलं, झालं नाही.

    ‘मेट्रो दोन ब’ – मंडाळा-चेंबूर मार्गिकेसाठी कशी आहेत मेट्रो स्टेशन्स?

    मेट्रो दोन ‘ब’च्या या टप्प्यात मंडाळा, मानखुर्द, बीएसएनएल (गोवंडी), शिवाजी चौक (चेंबूर) आणि डायमंड गार्डन (चेंबूर) या 5 स्थानकांचा समावेश आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा