मुंबईसह राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे. काल शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसे दिपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. काल या दिपोत्सवासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं. मनसे दिपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दुसरीकडे राज्यात अजूनही पावसाच्या सरी कोसळत असून ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने बाजारात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाई न मिळाल्याचं चित्र आहे. शेतकरी संकटात असताना दिवाळी साजरी कशी करणार? असा सवाल करत राज्य सरकारवर शरद पवार यांनी टीका करत राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
Maharashtra Live News 18th October 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
