Maoist Leader Bhupati Surrenders: गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. माओवादी नेता भूपतीने आपल्या ६० साथीदारांसह आत्मसमर्पण केले आहे. यामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
मात्र, थेट शस्त्रे सोडण्याच्या भूपतीच्या भूमिकेमुळे संघटनेत मतभेद वाढले. तेलंगण राज्य समितीच्या प्रवक्त्याने भूपतीवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी भूपतीला पत्रकातून गद्दार ठरवले आणि त्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. भूपतीला शस्त्रे काढून घेण्याचे निर्देशही देण्यात आले होते. यावर भूपतीने नंबाला केशव जिवंत असतानापासून युद्धबंदीवर चर्चा होत असल्याचे मत मांडले होते. यानंतर भूपती दंडकारण्यातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाले होते. तो तेलंगणमध्ये की महाराष्ट्रात आत्मसमर्पण करणार याकडे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले होते.
Gadchiroli: भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभं केलं; धर्मरावबाबा आत्रामांचा खळबळजनक आरोप
… म्हणून निवडले गडचिरोली
भूपतीची पत्नी तारक्का हिने जानेवारीत गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे भूपती गडचिरोलीत आत्मसमर्पण करणार असल्याचे निश्चित मानले जात होते. तो तेलंगण पोलिसांच्या संपर्कात असल्याचाही मतप्रवाह दंडकारण्यात होता. हे सारे घडत असतानाच गडचिरोली पोलिसांनी भूपतीच्या आत्मसमर्पणासाठी हालचाली वाढविल्या. सोमवारी रात्री छत्तीसगड हद्दीतून भूपतीने 60 माओवाद्यांसह भामरागड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. तिथून साऱ्यांना रात्री उशिरा गडचिरोलीत आणण्यात आले.
उद्धव ठाकरेंचा घरकोंबडा म्हणून उल्लेख, ज्योती वाघमारे बेक्कार बोलल्या
दहा विभागीय सदस्यांचा समावेश
भूपतीसोबत शरण आलेल्या 60 माओवाद्यांमध्ये दहा विभागीय समिती सदस्य आहेत. यातील बहुतांश गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेले असल्याने या भागातून माओवाद हद्दपार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आल्याचे मानले जात आहे.

