Pune Yewale Amruttulya: महाराष्ट्रातील प्रसिद्ध चहा ब्रँड येवले अमृततुल्य अडचणीत आला असून एमआयडीसी पोलिसांनी येवले कंपनीसह या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जुन्या चित्रपटांचे स्वामित्व हक्क असलेल्या शेमारू कंपनीने मागील आठवड्यात केलेल्या दोन तक्रारींनंतर काल सोमवारी आणखी तीन तक्रारी केल्या आहेत. शेमारू कंपनीकडे ‘गोलमाल’, ‘फिर हेराफेरी’ यासह अनेक चित्रपटांचे स्वामित्व हक्क आहेत. असं असताना येवले कंपनीने परवानगी न घेता या चित्रपटांमधील काही प्रसंग घेऊन ‘मिम’ तयार केले व आपल्या ब्रँडच्या व्यावसायिक फायद्यासाठी समाजमाध्यमांवर पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेमारू कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शेमारूने येवले कंपनीला जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून संबंधित चित्रपटांचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असून मिम तातडीने हटवा, असं सूचित केलं होतं. परंतु तरीही येवले कंपनीने मिम हटवले नाहीत. त्यामुळे आमचं 50 लाख रुपयांचे नुकसान झालं, असा दावा शेमारू कंपनीने तक्रारीत केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Pune Accident : आकाशने गावातील तरूणींना दिलेली लिफ्ट, कात्रज घाटात विचित्र अपघात जागीच दोघे ठार, 2 महिन्यांआधीच…
दरम्यान, ‘गोलमाल’ व ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांतील काही भाग, क्लिप, रिल्स व पोस्टर पोस्ट करून सुमारे 50 लाख रुपयांची कमाई केल्याचा शेमारू कंपनीकडून आरोप करण्यात आला आहे. शेमारू कंपनीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांकडून कंपनीसह नवनाथ येवले, मंगेश येवले, गणेश येवले, नीलेश येवले व तेजस येवले यांच्याविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

