MMRDA Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने मोठा प्लॅन आखला आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुलभ होणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल लवकरच तयार होईल.
कसा असेल हा भुयारी मार्ग?
हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. पहिला टप्पा 16 किमी लांबीचा असून, वांद्रे-वरळी सी-लिंकपासून बीकेसीमार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जोडला जाणार आहे. या मार्गाचा उद्देश बुलेट ट्रेन स्थानक आणि विमानतळाशी जलद व सुलभ संपर्क साधणे आहे. हा मार्ग थेट कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे.
Mumbai Metro: मेट्रो १ लवकरच ताब्यात? मार्गिकेच्या देखरेखीसाठी MMRDA स्वतंत्र कंपनी नेमणार
दुसऱ्या टप्प्यात, 10 किमी लांबीचा रस्ता बांधला जाणार असून, तो मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांना विमानतळाशी थेट जोडेल. हा मार्ग Western आणि Eastern Express Highways यांना जोडेल.
अंतिम टप्पा, 44 किमी लांबीचा असून तो दक्षिण मुंबईपासून बोरिवलीपर्यंत जाणार आहे. पुढे हा मार्ग ठाणे-बोरिवली टनेलशी जोडला जाण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई, बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होईल. वाहतूक कोंडीचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होईल, असा MMRDA चा दावा आहे.
प्रकल्पाचा अंदाजित खर्च
या प्रकल्पासाठी लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल (Detailed Project Report) तयार केला जाणार असून, सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण उपक्रमाचा अंदाजित खर्च 17 हजार कोटी रुपये असणार आहे. या प्रकल्पाबद्दल चर्चा करण्यासाठी पहिली बैठक ऑक्टोबर 17 ला घेटली जाईल आणि संपूर्ण चर्चा 7 महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता आहे. हा भुयारी मार्ग जर बांधण्यात MMRDA ला यश आले तर मुंबईतील वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटणार आहे.
Navi Mumbai Airport : विमानतळाचं उद्घाटन पण ‘दिबां’च्या नावाची घोषणा नाही, कोण होते दि. बा. पाटील ?
घाटकोपर-ठाणे मार्ग
दरम्यान, घाटकोपर ते ठाणे या 12.95 किमीच्या भूमिगत मार्गामुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतची सुमारे 700 झाडे छाटली जाणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकडून या संदर्भातील हरकती 16 ऑक्टोबरपर्यंत मागवल्या आहेत.

