Mahavitaran Strike: महाराष्ट्रात आजपासून वीज कर्मचारी ७२ तासांसाठी संपावर असणार आहे. वीजपुरवण्यासंबंधित काही तक्रारी असल्यास ग्राहकांनी कुठे करावा संपर्क? जाणून घ्या टोल फ्री क्रमांक…
गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) करण्यात आला आहे. लागू संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींची दिवाळी गोड! सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, तब्बल ४१० कोटी मंजूर, कधी मिळणार?
वीजपुरवठ्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल-फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन जोरदार बरसले, उद्धव ठाकरेंचं नाव न घेता काय-काय म्हणाले?
खासगीकरण नाही
महावितरण कंपनीची ३२९ उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालविण्यास सुरुवात केल्याचा आरोप चुकीचा असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. एप्रिल २०१९ नंतर तयार झालेल्या ३२९ उपकेंद्रांचे खासगीकरण केलेले नाही. ही उपकेंद्रे महावितरणच्या संबंधित कार्यालयांच्या अधिपत्याखालीच आहेत. या उपकेंद्रांतील केवळ बाह्यस्रोत कुशल मनुष्यबळासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्यासंदर्भात संबंधित एजन्सींना कार्यायादेश देण्यात आले. यात कोणत्याही प्रकारे खासगीकरण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

