• Mon. Mar 16th, 2026

    Nandurbar News: तुला जिवंत सोडणार नाही; बहिणीच्या प्रेमविवाहाने नाराज भावाचा प्रताप, भरधाव कारने पुतण्याला उडवलं

    Nandurbar News: तुला जिवंत सोडणार नाही; बहिणीच्या प्रेमविवाहाने नाराज भावाचा प्रताप, भरधाव कारने पुतण्याला उडवलं

    Nandurbar Crime News: नंदुरबारमध्ये एका भावाने बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीच्या पुतण्य़ाला गाडीने उडवलं आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश पाटील, नंदुरबार: तरुणीच्या परिवाराचा विरोध असताना युवकाने तिच्याशी प्रेम विवाह केला. याचाच राग मनात धरून तरुणीच्या भावाने त्या युवकाच्या पुतण्याला कारने धडक दिली. तरुणीच्या भावाने मजुरांची वाट पाहत अभा असलेल्या त्या युवकाच्या पुतण्याला भरधाव कारने मागून धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तो पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ माजली आहे.

    कुटुंबाच्या विरोधात जात केलं बहिणीशी लग्न

    नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील रायखेड येथे राहणाऱ्या अशपाक तेली याने गावातीलच आतिक युनूस पठाण याच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता. तरुणीच्या कुटुंबाचा विरोध असतानाही या दोघांनी त्यांच्या विरोधात जात लग्न केलं होतं. या घटनेनंतर आतिक युनूस पठाण याच्या मनात प्रचंड राग होता. त्यातून त्यांची आपसात धुसफूस सुरू होती.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: घर बांधायचं आहे, वडिलांना पैसे माग; तीन वर्ष त्रास सोसला, अखेर नको तेच घडलं, मन सुन्न करणारी कहाणी

    कारची जोरदार धडक देत जीवे मारण्याची धमकी दिली

    5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अशपाक याचा पुतण्या शोएब तेली हा रायखेड जवळ असलेल्या कोचरा फाट्याजवळ मजुरांची वाट पाहत उभा होता. यावेळी आतिक पठाण याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणून शोएब तेली याला मागून जोरदार धडक देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पठाण तेथून निघून गेला.

    पुतण्याला गंभीर दुखापत, तरुणीच्या भावाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

    या घटनेत शोएब तेली याच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी शोएब तेली याच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात आतिक युनूस पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता चे कलम 109, 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा