• Mon. Jun 8th, 2026
    Nagpur Crime : नागराज अण्णांनी रस्त्यावरुन उचलून स्टार केलं, पण ‘त्या’ सवयीने घात केला; ‘झुंड’मधल्या बाबूसोबत काय घडलं?

    Jhund Fame Actor Priyanshu Chhetri Babu Murder : नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमातील अभिनेता प्रियांशू उर्फ (बाबू) छेत्रीची हत्या करण्यात आली आहे. वायरने बांधून क्रूरपणे प्रियांशू छेत्रीला संपवण्यात आलं आहे. ही घटना काल मंगळवारी मध्यरात्री घडलीये.

    झुंड अभिनेता प्रियांशू छेत्री हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’चित्रपटातील बाबू छत्री या भूमिकेने प्रकाश झोतात आलेला अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू रवीसिंग छेत्री ऊर्फ बाबू छत्री (वय 21 रा. लुंबिनीनगर) याचा निर्घृण खून करण्यात आला. ही थरारक घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरातील ओमसाईनगर येथील निर्माणाधीन इमारतीत घडली. या घटनेनं पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादातून मित्रानेच त्याला संपिवल्याचं तपासादरम्यान पुढं आलं आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी बाबूच्या मित्राला अटक केली. ध्रुव उर्फ द्रुप शाहू (वय 20, रा. नारा), असं अटकेतील मारेकऱ्याचं नाव आहे. बाबू व ध्रुवला गांजा व दारूचं व्यसन आहे. बाबू याच्याविरूद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पोलिस दलातही त्याच्याविरूद्ध गुन्हे दाखल आहेत.

    ध्रुव व बाबूमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पैशासाठी वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये हाणामारीही झाली. या हाणामारीनंतर बाबू आपल्याला ठार मारेल, अशी भीती ध्रुव याला होती. काल मंगळवारी रात्री बाबू हा दारू पिवून घरी झोपला होता. रात्री ध्रुव त्याच्या घरी आला. त्याला उठविले. त्यानंतर ध्रुव हा मोटारसायकलने बाबूला घेऊन निर्माणाधीन इमारतीत गेला. तेथे दोघांनी दारू व गांजा प्यायला. त्यानंतर दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. वाद विकोपाला गेला. संतप्त ध्रुवने चाकूने बाबूच्या शरीरावर वार केले. बाबू गंभीर जखमी झाला. ध्रुव तेथून पसार झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांना बाबू हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. नागरिकांनी पोलिसांना माहिती देत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून बाबूला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून ध्रुव याचा शोध सुरू केला. ध्रुव हा नारा परिसरातील झुडपात मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला अटक केली.

    Maharashtra Timesमोठी बातमी! गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने निलेश घायवळच्या सख्ख्या भावाला शस्त्र परवाना

    बॉक्स रेल्वेतून कोळसा करायचा चोरी

    बाबू हा घरफोडी व चोरीसह रेल्वेतून कोळसाही चोरी करायचा. झुंड चित्रपटासाठी दिग्दर्शक मंजुळे हे कलाकरांचा शोध घेत गड्डीगोदाम परिसरात आले. यावेळी बाबू हा रेल्वेतून कोळसा काढत होता. मंजुळे यांना तो दिसला. चित्रपटातील छत्रीच्या भूमिकेसाठी मंजुळे यांनी त्याची निवड केली. त्यानंतर तो प्रसिद्ध झाला.

    Maharashtra TimesAccident News : शेतीचे ऑनलाईन काम करुन परतताना अनर्थ, धोकादायक वळणावर दुचाकींची जोरदार धडक, बाप-लेकासह तिघांचा मृत्यू

    बाबूला पोलिसांनी केली होती अटक

    नोव्हेंबर २०२२ मध्ये मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दी झालेल्या घरफोडीत पाच लाख व दागिने चोरी करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन चोराला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता बाबूच्या मदतीने घरफोडी केल्याचे मुलाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी बाबूला अटक केली.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा