Jalna News : अंबड तालुक्यात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळहळ व्यक्त होत आहे. लेक गेल्याने आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. शाळेला दांडी मारून मित्रांसोबत गेलेला रणवीर परत घरी परतलाच नाही.
शाळेला दांडी मारुन मित्रांसोबत तलावावर गेला आणि अनर्थ घडला
रणवीर राठोड इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. शाळेत खेळ मैदानात आणि अभ्यासात सुद्धा तो हुशार होता. शाळेच्या दुपारच्या सुट्टीमध्ये शाळेला दांडी मारून रणवीर आणि त्याचे दोन ते तीन मित्र पाझर तलावात पोहण्यासाठी तलाव परिसरात आले होते. मात्र यावेळी रणवीरला तलावातील पाण्याचा अंदाज आला नाही आणि रणवीर पाण्यात बुडाला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या इतर मित्रांनी आणि काही नागरिकांनी आरडाओरड केली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. रणवीरला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही.
परिसरात दुर्गंधी, पोलिसांना कळवलं आणि भयंकर समोर; आठ महिन्यांची गरोदर महिला झुडपात मृतावस्थेत, काय घडलं? नागपुरात खळबळ
संध्याकाळी रणवीरचा मृतदेह सापडला
घटनेची माहिती मिळताच गावातील 20 ते 25 तरुणांनी तलावात उतरून शोधमोहीम सुरू केली. त्याचबरोबर अंबड नगर परिषदेच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं. दुपारपासून सुरू असलेली मोहिम संध्याकाळपर्यंत चालली आणि अखेर सायंकाळी 5:15 वाजता रणीवरचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला.
Jalgaon News : देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले, वाटेत पती-पत्नीसोबत अनपेक्षित घटना; दुचाकीसमोर गाय आली आणि… महिलेचा दुर्दैवी शेवट
आई-वडिलांचा काळीज पिळवटणारा टाहो
शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आपल्या भविष्याचं सोनं करण्यासाठी गेलेल्या आपल्या चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला बघून आई-वडिलांनी एकच टाहो फोडला. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. संपूर्ण अंबड शहरासह लालवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. मुलाला अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. सदर घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

