Pune Lift Stuck Boy Death : पिंपरी-चिंचवड येथील चौवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्ट अडकल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला
लिफ्टमध्ये अडकून पिंपरी चिंचवडमध्ये एका बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऐन विजयादशमीच्या दिवशी, गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवड येथील चौवीसवाडी परिसरातील राम स्मृती सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान अडकली होती. या लिफ्टमध्ये १२ वर्षांचा मुलगा अडकला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली.
ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून लिफ्टमधून मुलाची सुटका केली. मुलाची सुटका करताच त्याला तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
Solapur Crime : बायकोचं लफडं असल्याचा संशय, विवाहित लेक भांडणं सोडवून झोपली, रात्रभरात बापाने ‘होत्याचं नव्हतं’ केलं!
दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला होता. लिफ्टमध्ये अडकून घाबरल्यामुळे त्याने प्राण गमावले, की श्वास घुसमटून त्याचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र लहानग्या मुलांना लिफ्टमध्ये एकटं सोडण्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Ajit Pawar | बारामतीकरांनी तेव्हा ऐकलं नाही, आम्ही गप्प बसलो! मतचोरीवरून अजित पवार आक्रमक
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता लिफ्टमध्ये नेमके काय बिघाड झाले ज्यामुळे ही दुर्घटना घडली, याचा तपास सुरू आहे.
Pune Crime : टीव्ही बंद कर न् डोळ्यात ड्रॉप घाल, पुण्यात 35 वर्षांच्या सचिनने रागात वडिलांनाच संपवलं, ऐन दसऱ्याला कोथरुड हादरलं
कार नदीत कोसळून मायलेकाचा अंत
दुसरीकडे, जळगाव-चोपडा मार्गावरील विदगावजवळ तापी नदीच्या पुलावर एक भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने एका कारला जोरदार धडक दिल्यामुळे कार पुलाचे कठडे तोडून थेट नदीपात्रात कोसळली. या अपघातात कारमधील शिक्षिका मीनाक्षी नीलेश चौधरी आणि त्यांचा बारा वर्षांचा मुलगा पार्थ यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती आणि चार वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

