Beed Yash Dhaka Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर बीडमध्ये जसं की, गुन्हेगारीची मालिकाच सुरु झाली आहे. आता तिथल्या एका स्थानिक पत्रकाराच्या मुलाला काही क्षुल्लक कारणावरुन पोटात चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या या हत्येचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना घडत आहेत. यामुळे आधीच जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना आता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्रीच्या सुमारास युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. चाकूने हल्ला करुन या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ज्या तरुणाची हत्या करण्यात आली तो स्थानिक पत्रकाराचा मुलगा असल्याची माहिती आहे.
Jalna News : पती तापाने फणफणला, पत्नीने छत्रपती संभाजीनगरची वाट धरली पण पतीने अर्ध्यावरच साथ सोडली; महिलेचा स्थानकावरच टाहो
या प्रकरणी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, मृत यश देवेंद्र ढाका (वय 22) हा बीड शहरातील पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा मुलगा होता. रात्रीच्या वेळी झालेल्या बाचाबाचीत आरोपींना चाकूने यशच्या छातीत सपासप वार केले, त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या छातीत आरपार चाकूचे वार गेल्याची माहिती आहे. या प्रकरणाने संपूर्ण बीड शहर हादरलं आहे.
जळगावच्या माजी महापौरांना अटक, फॉर्म हाऊसवर धक्कादायक कृत्य सुरु होतं, ललित कोल्हे यांच्यासह 8 जणांना बेड्या
या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं पहावयास मिळालं. या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, त्याची हत्या करताना थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

