राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने झोडपून काढलं आहे. मराठवाडा, विदर्भात तर अतिवृष्टीने उभ्या पिकांचा अक्षरश: चिखल झाला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला हास हिसकावला गेला असून काढणीला आलेली पिकं गुडघाभर पाण्यात भिजून खराब झाली आहे. मुंबईसह उपनगरातही शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज रविवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. पुढील तीन दिवस हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather 28th September 2025 : मुंबईसह उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू
