Buldhana Two Youths Die of Suffocation : बुलढाण्यामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. बायोडिझेल पंपाच्या टाकीत गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
काल गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता हे तिघे घरुन बाहेर पडले होते. रात्री साडेदहा वाजता पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तर मध्यरात्रीचे सुमारास गंभीर जखमी आरिफखान याला तातडीने मलकापूर येथील आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही मृतदेहांना तपासानंतर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात कसा घडला याबाबत वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.
Jalgaon Accident : भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं, आई-वडिलांसह लेकीला चिरडलं; क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत
याप्रकारच्या घटना वारंवार होत असल्यानं सुरक्षा काटेकोरपणे राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे. इंधन टाक्या व बायोडिझेल प्रकल्पांजवळ योग्य वायुविजन, ऑक्सिजन लेव्हल अलर्ट यंत्रणा, तसेच सुरक्षित वेशभूषेसह कामगारांना आत प्रवेश देण्याचे नियम बंधनकारक करणे आवश्यक आहे. कामगार व इतर कर्मचाऱ्यांना नियमितपणे आपत्कालीन परिस्थितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणे, अग्निशमन व वैद्यकीय पथक सतत उपलब्ध ठेवणे यावर भर देणे गरजेचे आहे. शासनानेही अशा प्रकल्पांची वेळोवेळी सुरक्षा तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक ठरत आहे. सुरक्षा उपाय न पाळल्यामुळे निष्पाप तरुणांचे जीवन धोक्यात जाणे ही धोक्याची घंटा असून, अशा घटना आळा घालण्यासाठी प्रशासन, पंप मालक व स्थानिक यंत्रणा यांनी जबाबदारपणे पावले उचलण्याची वेळ आली आहे.

