• Thu. Jun 25th, 2026

    तू नवऱ्याला का भेटलीस? मुंबईत लिव्ह इनमधील प्रियकराकडून 23 वर्षीय तरुणीवर हल्ला, चिमुकल्या मुलाला…

    ByMH LIVE NEWS

    Sep 26, 2025
    तू नवऱ्याला का भेटलीस? मुंबईत लिव्ह इनमधील प्रियकराकडून 23 वर्षीय तरुणीवर हल्ला, चिमुकल्या मुलाला…
    मुंबई
     मालाडमध्ये प्रियकराने विवाहित प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून प्रियंक उर्फ सिद्धार्थ पटेल याला अटक करण्यात आली आहे. प्रेयसी नवऱ्याला भेटल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केलं असून आरोपीने आधी महिलेला गोळ्या दिल्या आणि नंतर तिच्या मुलाचा वायरने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मालाडमध्ये लिव्ह इन रिलशेनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने 23 वर्षीय प्रेयसी पतीस भेटल्याच्या रागावरून तिचा आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाच्या हत्येचा बुधवारी प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेयसी व तिचा लहान मुलगा जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्याप्रकरणात मालवणी पोलिसांनी आरोपी प्रियंक उर्फ सिद्धार्थ पटेल (39) यास अटक केली. या हल्ल्यात पटेल याने प्रेयसीस औषधाच्या गोळ्या देत मुलाचा वायरीने गळा आवळून हत्येचा प्रयत्न केला.

    मिरा रोड येथे पती मुलासह राहणाऱ्या या 23 वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नव्हते. या कालावधीत तिची प्रियंक पटेल याच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या एका महिन्यापासून सदर तरुणी आणि प्रियंक हे मालाडमधील जुलूसवाडीतील एका चाळीत राहत होते. लिव्ह इनमध्ये राहताना पतीशी सगळे नाते तोडावे लागतील, अशी अट पटेल याने ठेवली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच आपली प्रेयसी पतीस भेटण्यासाठी मिरा रोड येथे गेल्याचे त्यास समजताच त्याने तिच्यासोबत वाद घातला. त्यानंतर तिला मारहाण करत तापाच्या गोळ्या खाण्याची जबरदस्ती केली. तसंच वायरने तिच्या मुलाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला.

    दरम्यान, यावेळी महिलेने पोलिस नियंत्रण कक्षास संपर्क केल्यानंतर पोलिस तिथे पोहोचले व तरुणीसह तिच्या मुलाची तिथून सुटका केली. या दोघांना उपचारासाठी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed