Ahilyanagar Dattatray Bharane Tour : ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी, याबाबत दुमत नाही. पण, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत योग्य निर्णय घेऊ, राज्य सरकार कुठल्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही’, असं राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांवी ग्वाही दिली.
७.४९ लाख एकर शेतीचे नुकसान
कृषीमंत्र्यांनी सांगितलं की, आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 7 लाख 49 हजार एकर शेती क्षेत्राचं नुकसान झालं असून, त्यापैकी मागील एका महिन्यातच 6 लाख 34 हजार एकर क्षेत्र बाधित झाले आहे. एकाही शेतकऱ्याचे एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्याविना राहणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नंदुरबारमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, जोरदार गदारोळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
ई-पीक पाहणीला मुदतवाढ
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच विमा कंपन्यांना तातडीने मदत वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
घर गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत
ज्या शेतकऱ्यांचे शेत, घर किंवा छप्पर वाहून गेले आहे, अशांना जिल्हा प्रशासनाकडून गृहोपयोगी साहित्य, किराणा व तातडीची मदत पुरविण्याचे आदेश दिले असल्याचे भरणे म्हणाले.
विभक्त आई-वडिलांनी चार लेकींना नातेवाईकांकडे दिलं, नराधम दाम्पत्याकडून लैंगिक अत्याचार; पोलिस तपास करताना धक्कादायक प्रकरण समोर
अतिक्रमणावर गंडांतर
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दाही त्यांनी हाती घेतला. “शासन गंभीर असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रशासन करेल,” असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांचा कृषीमंत्र्यांना घेराव
मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर आज अनेक मंत्री नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे आज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर संताप व्यक्त करत कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर कृषीमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करून चांगलंच झापलं.

